दुबई, आशिया चषक 2018 : पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात महेंद्रसिंह धोनीने केलेला DRS चा अचुक वापर हा सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला होता. DRS ला 'धोनी रिव्ह्यू सिस्टीम' अशी कौतुकाची थापही अनेकांनी मारली होती. पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात आठव्या षटकाच्या अखेरच्या चेंडूवर युजवेंद्र चहलने पायचीतची अपील केली. त्यावेळी इमाम उल हक फलंदाजी करत होता. ही अपील पंचांनी नाकारली. त्यावेळी DRS घ्यायचा की नाही, याबाबत संभ्रम होता. रोहित आणि चहल आणि धोनीला विचारणा केली आणि धोनीने तात्काळ DRS घ्यायला सांगितले.
तिसऱ्या पंचांनी तो चेंडू पुन्हा एकदा पाहिला आणि इमाम बाद असल्याचे सांगितले. मैदानावरील पंचांनी आपला निर्णय बदलला आणि इमामला बाद घोषित केले. त्यावेळी भारतीय संघातील प्रत्येकाने धोनीचे आभार मानले. त्यामुळेच DRS म्हणजे धोनी रीव्ह्यू सिस्टीम आहे, असे आता वाटायला लागले आहे.
बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात पाकिस्तानचा कर्णधार सर्फराज अहमद आणि मोहम्मद नवाझ यांनी घेतलेला DRS फसला. त्यानंतर कॉमेंटेटर आकाश चोप्राने धोनीच्या निर्णयाची आठवण करून दिली आणि धोनीने निवृत्तीनंतर DRS चा क्लास सुरू करावा. धोनीच्या या क्लासमध्ये सर्व संघांच्या कर्णधारांनी प्रवेश घ्यावा, असा सल्लाही त्याने दिला.
Web Title: Asia Cup 2018: All the captains should get admission in Mahendra Singh Dhoni's 'DRS' class
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.