ठळक मुद्देआशिया चषकामध्ये सर्वांना उत्सुकता आहे ती भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्याची.
दुबई, आशिया चषक 2018 : आशिया चषक क्रिकेट स्पर्धेला काही मिनिटांमध्ये सुरुवाच होणार आहे. या स्पर्धेत सलामीची सामना श्रीलंका आणि बांगलादेश यांच्यामध्ये होणार आहे. बांगलादेशने नाणेफेक जिंकून फलंदाजी स्वीकारली आहे.
आतापर्यंत बांगलादेशला एकदाही आशिया चषकाचे जेतेपद पटकावता आलेले नाही. त्यामुळे यावेळी त्यांनी सरावावर अथक मेहनत घेतली आहे.
आशिया चषकामध्ये सर्वांना उत्सुकता आहे ती भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्याची. कारण बऱ्याच महिन्यांनी हे दोन पारंपरिक प्रतिस्पर्धी एकमेकांसमोर उभे ठाकणार आहेत. यापूर्वी चॅम्पियन्स करंडक स्पर्धेच्या अंतिम फेरीत या दोन्ही देशांची शेवटची गाठ पडली होती. हा सामना पाकिस्तानने जिंकला होता.
बांगलादेशचा संघ
श्रीलंकेचा संघ
Web Title: Asia Cup 2018: Bangladesh won the toss and opted to bat, opening match with Sri Lanka
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.