दुबई : आशिया चषकातील पहिल्याच सामन्यात बांगलादेशने श्रीलंकेवर १३७ धावांनी विजय साजरा केला आहे. मुशिफिकूर रहिम याच्या शतकाच्या जोरावर बांगलादेशने प्रथम फलंदाजी करताना श्रीलंकेविरोधात २६१ धावा केल्या. मात्र लंकेचा संघ फक्त १२४ धावाच जमवू शकला.
आशिया चषकाला शनिवारी सुरुवात झाली. त्यात पहिल्याच सामन्यात बांगलादेशने श्रीलंकेला नमवले. या सामन्यात लंकेची सुरुवातच खराब झाली सलामीवीर कुसाल मेंडिस भोपळाही फोडू शकला नाही. सुरुवातीच्या ११ चेंडूत उपुल थरंगा याने जोरदार फटकेबाजी करत २२ धावा केल्या. मात्र मेंडिस बाद झाल्यानंतर लंकेच्या डावाला गळती लागली. थरंगा, डिसिल्वा, कुसाल परेरा हे सलग बाद झाल्याने लंकेचा संघ अडचणीत आला. बांगलादेशच्या मुस्तफिजूर रहमान, मेहदी हसन मिराज आणि कर्णधार मश्रफी मोर्तुझा या त्रिकुटाने लंकेच्या फलंदाजांना हैरण केले. त्यांनी प्रत्येकी दोन बळी घेतले. लंकेकडून दिलरुवान परेरा याने सर्वाधिक २९ केल्या.
तत्पूर्वी, बांगलादेशच्या मुशिफिकूर रहिम याने केलल्या शतकी खेळीच्या जोरावर लंकेला २६२ धावांचे आव्हान मिळाले होते. बांगलादेशची सुरुवातही खराब झाली होती. मलिंगा याने सलामीवीर लिट्टन दास आणि पुढच्याच चेंडूवर अष्टपैलू शाकीब अल हसन याला बाद करत बांगलादेशला मोठा धक्का दिला. त्यानंतर चौथ्या स्थानावर आलेल्या मुशिफिकूर याने संघाला सावरणारी खेळी केली. त्यातच बांगलादेशला आणखी एक धक्का बसला. सलामीवीर तमीम इक्बाल दुखापतीमुळे रिटायर्ड हर्ट होऊन तंबूत गेला. मुशिफिकूर याने मोहम्मद मिथून (६३) याच्या साथीने संघाचा डाव सावरला. या दोघांनी १३१ धावांची भागीदारी केली.
मिथून बाद झाल्यावर पुन्हा एकदा बांगलादेशची घसरगुंडी उडाली. मोहमदुल्लाह आणि मोस्द्देक हुसेन हे लवकर बाद झाले. त्यावेळी बांगलादेशची अवस्था ५ बाद १४२ अशी होती. त्यानंतर मुशिफिकूर रहिम याने सर्व सूत्रे आपल्या हाती घेत तळाच्या फलंदाजांसोबत महत्त्वपूर्ण भागीदारी करत संघाचा डाव अडिचशेच्या वर नेला. मलिंगा याने चार बळी घेतले.
धावफलक : बांगलादेश : ४९.३ षटकांत २६१ धावा
तमिम इक्बाल नाबाद २, लिट्टन दास झे. मेंडिस गो. मलिंगा ०, शाकिब अल हसन गो. मलिंगा ०, मुशिफिकूर रहिम झे. मेंडिस गो. थिसरा परेरा १४४, मोहम्मद मिथून झे. परेरा गो मलिंगा ६३, मोहम्मदुल्लाह झे. डि सिल्वा गो ओपोन्सो १, मोसाड्डेक हुसेन झे. परेरा गो. मलिंगा १, मेहदी हसन मिराज झे. आणि गो. सुरंगा लकमल १५, मश्रफी मोर्तुझा झे. थरंगा गो. डिसिल्वा १, रुबेल हुसेन पायचीत गो. डि सिल्वा २, मुस्तफिजूर रहमान धावबाद मेंडिस/परेरा १०, अवांतर १२. गोलंदाजी : लसिथ मलिंगा १०-२-२३-४, सुरंगा लकमल १०-०-४६-१, अमिला ओपोन्सो ९-०-५५-१, थिसरा परेरा ७.३-०-५१-१, दिलरुवान परेरा ३-०-२५-०, डि सिल्वा ७-०-३८-२, दासून शनाका ३-०-१९-०.
श्रीलंका : ३५.२ षटकांत १२४ धावा
उपुल थरंगा गो. मश्रफी मोर्तुझा २७, कुसाल मेंडिस पायचीत मुस्तफिजूर रहमान ०, कुसाल परेरा पायचीत मिराज ११, डिसिल्वा पायचीत मश्रफी मोर्तुझा ०, अँजेलो मॅथ्युज् पायचीत रुबेल हुसेन १६, दासून शनाका धावबाद शाकीब अल हसन/मिराज ७, थिसरा परेरा झे. रुबेल हुसेन गो. मिराज ६, दिलरुवान परेरा यष्टीचीत लिट्टन दास गो. मोसाद्देक हुसेन २९, सुरंगा लकमल गो. मुस्तफिजूर २० अमिला अपोन्सो झे. नजमुल हुसेन गो. शाकिब अल हुसेन ०, लसिथ मलिंगा नाबाद ० अवांतर १. गोलंदाजी - मश्रफी मोर्तुझा ६-२-२५-२, मुस्तफिजूर रहमान ६-०-२०-२, मेहदी हसन मिराज ७-१-२१-२, शाकिब अल हसन ९.२-०-३१-१, रुबेल हुसेन ४-०-१८-१, मोसाद्देक हुसेन ३-०-८-१
Web Title: Asia Cup 2018: Bangladesh's winning opening; Sri Lanka win by 137 runs
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.