दुबई, आशिया चषक 2018 : आशिया चषकातबांगलादेशचा आज पाकिस्तानविरुद्ध महत्त्वाचा सामना रंगणार आहे. हा जवळपास उपांत्य फेरीचा सामना असल्याचेच चाहत्यांचे म्हणणे आहे. कारण हा सामना जो संघ जिंकेल त्यांना अंतिम फेरीत पोहोचता येणार आहे. पण या सामन्यापूर्वीच बांगलादेशला मोठा धक्का बसला आहे.
बांगलादेशसाठी एक चांगली गोष्ट घडली आहे, ती म्हणजे त्यांच्याबाजूने नाणेफेकीचा कौल लागला आहे. बांगलादेशने नाणेफेक जिंकत पाकिस्तानविरुद्ध प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
बांगलादेशचा कर्णधार मश्रफी मुर्तझा नाणेफेकीला आला आणि त्यावेळी त्यानेच आम्हाला मोठा धक्का बसल्याचे सांगितले. या सामन्यापूर्वीच बांगलादेशचा अनुभवी अष्टपैलू खेळाडू शकिब अल हसनच्या बोटाला दुखापत झाली आहे. त्याच्या बोटाला फ्रॅक्चर झाले असून तो या सामन्यात खेळणार नाही. त्यामुळे हा बांगलादेशसाठी मोठा धक्का आहे. या धक्क्यातून बांगलादेशचा संघ कसा सावरतो, याकडे सर्वांच लक्ष असेल.