दुबई, आशिया चषक 2018 : पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात भारताचा अष्टपैलू हार्दिक पंड्याला मैदानात दुखापत झाली आहे. पंड्याची दुखापत गंभीर स्वरुपाची दिसत असल्यामुळे भारताची चिंता वाढली आहे. त्यामुळेच त्याला बदली खेळाडू मागवण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. राजस्थानचा गोलंदाज दीपक चहरला संघात बोलवण्यात आले असल्याचा दावा एका इंग्रजी वृत्तपत्राने केला आहे.
( Asia Cup 2018 : भारत-पाकिस्तान सामन्याचा एवढा बाऊ कशाला? )
इंग्लंड दौऱ्यात चहरचा भारतीय ट्वेंटी-20 संघात समावेश करण्यात आला होता. त्याने तिसऱ्या सामन्यात पदार्पण करताना 43 धावांत एक बळी टिपला होता. चहरला बोलावण्यात आल्यामुळे राजस्थान संघाला विजय हजारे चषक स्पर्धेत धक्का बसला आहे. 2018च्या इंडियन प्रीमिअर लीगमध्ये त्याने चेन्नई सुपर किंग्जचे प्रतिनिधित्व करताना 10 विकेट घेतल्या होत्या.
(Asia Cup 2018: भारताने नोंदवला पाकिस्तानवर सर्वात मोठा विजय, कसा ते वाचा)
इंग्लंड दौऱ्यातीत तिरंगी मालिकेत भारत अ संघातही चहरला संधी मिळाली होती. त्यात त्याने चार सामन्यातं दहा विकेट घेतल्या होत्या. आयर्लंडविरुद्धच्या सामन्यात जसप्रीत बुमराला दुखापत झाल्याने चहरला राष्ट्रीय संघात संधी मिळाली. त्याचा इंग्लंडविरुद्धच्या ट्वेंटी-20 संघात समावेश करण्यात आला होता. पंड्या दुखापतीतून सावरला नाही तर चहरला भारतीय वन डे संघात संधी मिळू शकते. भारत सुपर फोर गटात बांगलादेश ( 21 सप्टेंबर), पाकिस्तान ( 23 सप्टेंबर) आणि अफगाणिस्तान ( 25 सप्टेंबर) यांचा सामना करणार आहे.
Web Title: Asia Cup 2018: Deepak Chahar added to India's Asia Cup squad as cover for injured Hardik Pandya
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.