मुंबई, आशिया चषक 2018 : काही दिवसांमध्ये आता आशियाच चषक क्रिकेट स्पर्धेला सुरुवात होणार आहे. या स्पर्धेतील भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्याची क्रिकेट चाहते आतूरतेने वाट पाहत आहे. पण आतापर्यंत आशियाच चषक स्पर्धेत कोणी किती जेतेपदे पटकावली आहेत, हे तुम्हाला माहिती आहे का...
आशिया चषक स्पर्धेला 1984 साली सुरुवात झाली. ही स्पर्धा शारजा येथे खेळवली गेली होती. या स्पर्धेचे जेतेपद भारताने पटकावले होते. त्यानंतर 1986 झालेल्या दुसऱ्या स्पर्धेत श्रीलंकेने विजेतेपद मिळवले होते. यानंतर झालेल्या तीन स्पर्धांमध्ये भारताने बाजी मारत जेतेपदाची हॅट्ट्रिक साजरी केली होती. पण यानंतर मात्र भारताला 2010 आणि 2016 या साली झालेल्या स्पर्धांमध्येच जेतेपदे पटकावता आली होती.
आशिया चषक स्पर्धेत आतापर्यंत भारताचीच सरशी राहिलेली आहे. कारण भारताने आतापर्यंत सहा वेळा या स्पर्धेची जेतेपदे पटकावली आहेत. श्रीलंकेने आतापर्यंत पाच वेळा जेतेपदे पटकावली आहेत. पाकिस्तानला आतापर्यंत दोन वेळाच ही स्पर्धा जिंकता आलेली आहे. पण बांगलादेशला मात्र आतापर्यंत एकदाही ही स्पर्धा जिंकता आलेली नाही.
- आतापर्यंतचे आशिया चषकाचे विजेते
- 1984 (शारजा) विजेता: भारत. - 1986 (श्रीलंका) विजेता: श्रीलंका.- 1988 (बांगलादेश) विजेता: भारत. - 1990 (भारत) विजेता: भारत. - 1995 (यूएई) विजेता: भारत. - 1997 (श्रीलंका) विजेता: श्रीलंका. - 2000 (बांगलादेश) विजेता: पाकिस्तान. - 2004 (श्रीलंका) विजेता: श्रीलंका. - 2008 (पाकिस्तान) विजेता: श्रीलंका.- 2010 (श्रीलंका) विजेता: भारत. - 2012 (बांगलादेश) विजेता: पाकिस्तान. - 2014 (बांगलादेश) विजेता: श्रीलंका. - 2016 (बांगलादेश) विजेता: भारत.