Asia Cup Final : आशिया चषकावर भारताचीच 'सत्ता'

अखेरच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या रोमहर्षक लढतीत अखेर भारताने तीन विकेट्स राखून विजय मिळवला. बांगलादेशने प्रथम फलंदाजी करताना 222 धावा केल्या होत्या. या आव्हानाचा पाठलाग करताना भारताने अखेरच्या चेंडूवर एकेरी धाव घेत विजय मिळवला.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2018 04:33 PM2018-09-28T16:33:56+5:302018-09-29T07:48:49+5:30

whatsapp join usJoin us
Asia Cup 2018 IND v BAN : India won toss, field fieldings decisionAsia Cup Final LIVE :  भारताने नाणेफेक जिंकली, क्षेत्ररक्षणाचा निर्णय | Asia Cup Final : आशिया चषकावर भारताचीच 'सत्ता'

Asia Cup Final : आशिया चषकावर भारताचीच 'सत्ता'

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

आशिया चषकावरभारताचीच 'सत्ता'

दुबई: अखेरच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या थरारक सामन्यात केदार जाधवने बांगलादेशविरुद्ध विजयी धाव घेत भारताच्या सातव्या आशिया चषक क्रिकेट स्पर्धेच्या जेतेपदावर शिक्कामोर्तब केले. अत्यंत रोमांचक झालेल्या सामन्यात बांगलादेशने स्पर्धेत अपराजित राहिलेल्या भारताला अखेरपर्यंत झुंजवले. मात्र, भारतीयांनी आपल्या अनुभवाच्या जोरावर जेतेपद निसटू दिले नाही. गतविजेत्या भारताने सलग दुसऱ्यांदा स्पर्धेत बाजी मारताना सर्वाधिक सातव्यांदा आशिया चषक पटकावला. बांगलादेशने प्रथम फलंदाजी करताना ४८.३ षटकात २२२ धावा केल्यानंतर भारताने ५० षटकात ७ बाद २२३ धावा करुन रोमांचक विजय मिळवला.
दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात नाणेफेक जिंकून भारतीय कर्णधार रोहित शर्माने क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. मात्र बांगलादेशचा सलामीवीर लिट्टन दास याने सर्व सूत्रे आपल्या हाती घेत भारताचा निर्णय चुकीचा ठरवला. त्याने एकट्याने ११७ चेंडूत १३ चौकार व २ षटकारांसह १२१ धावांचा तडाखा देत संघाला समाधानकारक मजल मारुन दिली. मात्र अन्य फलंदाज अपयशी ठरल्याने बांगलादेशला मोठी धावसंख्या उभारता आली नाही. या धावांचा पाठलाग करताना भारताचा सहज विजय मानला जात होता. रोहित आणि शिखर धवन यांनी भारताला वेगवान सुरुवातही करुन दिली होती. मात्र बांगलादेशने झुंजार खेळ करताना पुनरागमन केले. शिखर धवन (१५), अंबाती रायुडू (२) यांना झटपट बाद करत त्यांनी भारताला दडपणाखाली आणले. रोहितने दिनेश कार्तिकसह भारताला सावरण्याचा प्रयत्न केला. त्याने ५५ चेंडूत ३ चौकार व ३ षटकारांसह ४८ धावा केल्या. रोहितची खेळी भारताच्या डावातील सर्वाधिक धावांची खेळी ठरली. रोहित खेळपट्टीवर असेपर्यंत सामन्यावर भारताची पकड होती. मात्र, रुबेल हुसैनने त्याला बाद करुन भारताला दबावाखाली आणले. कार्तिक (३७), महेंद्रसिंग धोनी (३६) बाद झाल्यानंतर केदार जाधव वैयक्तिक १९ धावांवर रिटायर्ड हर्ट झाल्याने भारताचा डाव ३८ षटकात ५ बाद १३७ असा घसरला.
यावेळी, रविंद्र जडेजा (२३) - भुवनेश्वर कुमार (२१) यांनी ४५ धावांची भागीदारी करत भारताला विजयी मार्गावर कायम ठेवले. जडेजा परतल्यानंतर बांगलादेशच्या आशा उंचावल्या खºया मात्र पुन्हा मैदानात आलेल्या केदारने अखेरपर्यंत टिकून राहत बांगलादेशच्या हातून जेतेपद हिसकावून घेतले. बांगलादेशकडून मुस्तफिझूर रहमान (२/३८), रुबेल (२/२६) यांनी चांगला मारा केला.
तत्पूर्वी, सलामीवीर लिट्टन दास याच्या ११७ चेंडूतील १३ चौकार व २ षटकारांसह केलेल्या १२१ धावांच्या खेळीनंतरही बांगलादेश मोठी मजल मारु शकला नाही. त्यांच्या इतर फलंदाजांनी भारतीय गोलंदाजांसमोर नांगी टाकली. सौम्य सरकार आणि मेहदी हसन यांचा अपवाद वगळता इतर कोणताही फलंदाज दुहेरी आकडा गाठू शकला नाही. भारताच्या पाचही गोलंदाजांना एकटा लिट्टन पुरून उरत होता. त्याला पहिल्या आणि १२व्या षटकात जिवदानही मिळाले होते. हे दोन जिवदान भारतीय संघाला चांगलेच महागात पडले. (वृत्तसंस्था)

धावफलक

बांगलादेश : लिट्टन दास १२१, मेहदी हसन मिराज ३२, इमरूल कायेस २, मुशिफिकूर रहिम ५, मोहम्मद मिथून २, महमदुल्लाह ४, सौम्य सरकार ३३, मश्रफी मोर्तझा ७, नजमुल इस्लाम ७, मुस्तफिजूर रहमान नाबाद २, रुबेल हुसेन ०. अवांतर - ७. एकूण : ४८.३ षटकांत सर्वबाद २२२ धावा.
गोलंदाजी : भुवनेश्वर 0/33, बुमराह १/३९, चहल १/३१, कुलदीप ३/४५, केदार २/४१.
भारत : रोहित शर्मा ४८, शिखर धवन १५, दिनेश कार्तिक ३७, महेंद्र सिंह धोनी ३६, केदार जाधव नाबाद २३, रविंद्र जाडेजा २३, भुवनेश्वर कुमार २१, कुलदीप यादव नाबाद ५. अवांतर १२. एकूण : ५० षटकांत ७ बाद २२३ धावा.
गोलंदाजी : मुस्तफिजूर रहमान २/३८, नजमुल इस्लाम १/५६, मोर्तझा १/३५, रुबेल हुसेन २/२६, मोहमदुल्लाह १/३३.

केदारमुळे दडपण दूर...
लिट्टन दास आणि मेहदी हसन यांच्या आक्रमक भागिदारीमुळे पहिल्या २० षटकापर्यंत भारतीय संघाची मजबूत धुलाई झाली. मात्र, २१व्या षटकात केदार जाधवने मेहदी हसनला बाद करुन भारताला पहिले यश मिळवून दिले आणि बांगलादेशच्या फलंदाजीला गळती लागली. त्याने बदली गोलंदाज म्हणून कर्णधार रोहित शर्माचा विश्वास सार्थ ठरवताना बांगलादेशला दडपणाखाली आणले.
चायनामनने घेतली फिरकी..
केदार जाधवने बांगलादेशला दडपणाखाली आणल्यानंतर कुलदीप यादवने दुसºया बाजूने भेदक मारा करताना बांगलादेशला बॅकफूटवर आणले. त्याने लिट्टन दासच्या महत्त्वपूर्ण बळीसह महमुद्दुल्लाह व कर्णधार मश्रफी मोर्ताझा यांनाही तंबूची वाट दाखवून सामन्याव भारताला प



 

भारताला विजयासाठी 6 चेंडूंत 6 धावांची गरज



 

भारताला पुन्हा एक धक्का, भुवनेश्वर बाद



 

भारताला विजयासाठी 12 चेंडूंत 9 धावांची गरज

भारताला मोठा धक्का, रवींद्र जडेजा बाद


भारताला विजयासाठी 24 चेंडूंत 18 धावांची गरज

blockquote class="twitter-tweet" data-lang="en">

B Kumar helps swing the momentum back in India's favor!
End of 46 overs:
IND - 205/5
R Jadeja 20*
B Kumar 16*
Need 18 runs in 24 balls#INDvBAN#AsiaCup2018

— AsianCricketCouncil (@ACCMedia1) September 28, 2018

 

भुवनेश्वरचा खणखणीत षटकार



 

भारताला विजयासाठी 30 चेंडूंत 26 धावांची गरज

भारताला विजयासाठी 36 चेंडूंत 32 धावांची गरज



 

भारताला विजयासाठी 54 चेंडूंत 45 धावांची गरज

जायबंदी केदार जाधव पॅव्हेलियनमध्ये परतला



 

भारताला मोठा धक्का; महेंद्रसिंग धोनी बाद 



 

भारताला चौथा धक्का; दिनेश कार्तिक बाद



 

धोनी आणि कार्तिक यांची अर्धशतकी भागीदारी



 

भारत 25 षटकांत 3 बाद 112

भारत 20 षटकांत 3 बाद 90



 

रोहित शर्मा बाद, भारताला मोठा धक्का



 

दुबई, आशिया चषक 2018 : बांगलादेशने विजयासाठी ठेवलेल्या 223 धावांचा पाठलाग करण्यासाठी भारताचे शिलेदार मैदानावर उतरले आहेत. रोहित शर्मा आणि शिखर धवन यांनी दमदार सुरूवात केली. मात्र, पाचव्या षटकात शिखर धवन बाद झाला. त्याला आशिया स्पर्धेच्या एका हंगामात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम नावावर करता आला नाही. भारताच्या पाच षटकांत 1 बाद 35 धावा झाल्या होत्या. 8 व्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर मुश्रफे मुर्तझाने अंबाती रायुडूला बाद करत भारताला दुसरा धक्का दिला. भारताच्या 10 षटकांत 2 बाद  57 धावा झाल्या असून रोहित एकटा खिंड लढवत आहे.



 



मधल्या फळीतील अपयशामुळे बांगलादेशची गाडी घसरली

लिटन दास आणि मेहदी हसन यांच्या विक्रमी भागीदारीनंतरही बांगलादेशचा आशिया चषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारताविरुद्ध 223 धावांचे माफक आव्हान उभे करता आले. मधल्या फळीतील फलंदाजांच्या अपयशामुळे बांगलादेशला मोठी धावसंख्या उभारता आली नाही. 20 षटकांत बिनबाद 116 धावा असणाऱ्या बांगलादेशला पुढील 20 षटकांत केवळ 62 धावा करता आल्या आणि त्यांचे पाच फलंदाजही माघारी फिरले. अखेरच्या दहा षटकांत शतकवीर लिटन जोरदार खेळी करेल असे वाटत होते, परंतु कुलदीप यादवने त्याला 41 व्या षटकात महेंद्रसिंह धोनीकरवी यष्टिचीत करून बाद केले. त्यानंतर बांगलादेशला जेमतेम 222 धावांपर्यंतच मजल मारता आली. भारताच्या कुलदीप यादवने सर्वाधिक 3 विकेट घेतल्या. 



 

लिटन दासची 121 धावांची खेळी ही भारताविरुद्ध बांगलादेशच्या फलंदाजाने केलेली सर्वोत्तम खेळी ठरली. बांगलादेशच्या 48 षटकांत 8 बाद 221 धावा झाल्या आहेत. 49व्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर सौम्या सरकारही धावबाद झाला.



 





दासच्या शतकी खेळीला बांगलादेशच्या अन्य फलंदाजांकडून साजेशी साथ मिळाली नाही. त्यांचे पाच फलंदाज लगेच माघारी फिरले. त्यामुळे बांगलादेशची धावसंख्येवरही लगाम बसली. 40 षटकांत त्यांच्या 5 बाद 178 धावा झाल्या होत्या. 41 व्या षटकाच्या अखेरच्या चेंडूवर महेंद्रसिंह धोनीने अप्रतिम यष्टिचीत करताना लिटन दासला बाद केले. दासने 117 चेंडूंत 12 चौकार व 2 षटकारांसह 121 धावा केल्या.





लिटन दासने वन डेतील पहिले शतक झळकावताना बांगलादेशला 29 षटकांत 4 बाद 145 धावांची मजल मारून दिली. मात्र महमदुल्लाहही बाद झाला. बांगलादेशच्या 35 षटकांत 5 बाद 160 धावा केल्या आहेत.



 



 



बांगलादेशचा दुसरा धक्का. युजवेंद्र चहलने इम्रुल कायेसला पायचीत केले. त्यापाठोपाठ मुशफिकरही माघारी फिरला. रवींद्र जडेजाने अप्रतिम क्षेत्ररक्षण करून मोहम्मद मिथूनला धावबाद केले. 



 



 



 

बांगलादेशच्या लिटन दास व मेहदी हसन यांनी भारतीय गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला. दोघांनी पहिल्या विकेटसाठी शतकी भागीदारी करताना बांगलादेशला स्पर्धेतील सर्वोत्तम सुरूवात करुन दिली. 120 धावांवर बांगलादेशला पहिला धक्का बसला. पार्टटाईम गोलंदाज केदार जाधवने भारताला यश मिळवून दिले. त्याने मेहदी हसनला 32 धावावंर अंबाती रायुडूकरवी झेलबाद करून माघारी धाडले. बांगलादेशच्या 21 षटकांत 1 बाद 120 धावा झाल्या आहेत.



प्रथमच सलामीला आलेल्या मेहदी हसनने खेळपट्टीवर नांगर रोवून लिटन दासला चांगली सुरूवात करून दिली. त्याचा फायदा घेत दासने भारतीय गोलंदाजांवर जोरदार प्रहार केला. त्याने वैयक्तिक सर्वोत्तम खेळी करताना संघाला 20 षटकांत 116 धावांचा पल्ला गाठून दिला.





 

बांगलादेशला 12व्या षटकात भारताने जीवदान दिले. अर्धशतकी खेळी करणाऱ्यी लिटन दासचा सोपा झेल युजवेंद्र चहलने सोडला.





 

लिटन दास आणि मेहदी हसन यांनी बांगलादेशला दमदार सुरूवात करून देताना 10 षटकांत  65 धावा केल्या. त्यांनी भारतीय गोलंदाजांचा मोठा संयमाने सामना केला. 



बांगलादेशने पाच षटकांत 33 धावा करताना चांगली सुरुवात केली. यंदाच्या आशिया चषक स्पर्धेतील बांगलादेशची ही सलामीची सर्वोत्तम भागीदारी आहे. 



भारताचे पारडे जड. आशिया चषक स्पर्धेत 11 पैकी 10 सामन्यांत भारताने विजय मिळवला आहे.



आशिया चषक स्पर्धेत आतापर्यंत अपराजित राहिलेल्या भारतीय संघ आज अंतिम सामन्यात बांगलादेशचा सामना करणार आहे. भारताला सातव्यांदा आशिया चषक उंचावण्याची संधी आहे, परंतु बांगलादेश त्यांना सहजासहजी यश मिळवू देणार नाही. भारताने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला आहे. 

असा असेल संघ



 

अंतिम सामन्यासाठी भारतीय संघ दुबईच्या आंतरराष्ट्रीय स्टेडियमकडे रवाना होताना... 



 

Web Title: Asia Cup 2018 IND v BAN : India won toss, field fieldings decisionAsia Cup Final LIVE :  भारताने नाणेफेक जिंकली, क्षेत्ररक्षणाचा निर्णय

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.