मुंबई, आशिया चषक 2018 : भारत आणि हाँगकाँग यांच्यामध्ये आज आशिया चषकातील सामना रंगणार आहे. या स्पर्धेतील भारताचा हा पहिला सामना आहे, पण यापूर्वी फक्त एकदाच भारत आणि हाँगकाँग यांच्यामध्ये लढत झाली आहे. ही लढत तुम्हाला आठवतेय का...
भारत आणि हाँगकाँग यांच्यामध्ये 2008 साली कराची येथे आशियाच चषकातील एक लढत झाली होती. या लढतीत भारताने दमदार विजय मिळवला होता. या सामन्यातील विशेष बाब म्हणजे कर्णधार महेंद्रसिंग धोनी आणि सुरेश रैना या दोघांनीही या सामन्यात शतक झळकावले होते.
भारताने प्रथम फलंदाजी करताना धोनी आणि रैना यांच्या शतकाच्या जोरावर 374 धावांचा डोंगर उभारला होता. या आव्हानाचा पाठलाग करताना 118 धावांवर आटोपला होता आणि भारताने 256 धावांनी दणदणीत विजय मिळवला होता. या सामन्यात पीयूष चावलाने चार बळी मिळवले होते.