दुबई, आशिया चषक 2018 : आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत भारताला मोठा धक्का बसला आहे. भारतीय संघातील प्रमुख अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्याला दुखापतीमुळे स्पर्धेतून माघार घ्यावी लागली आहे. पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात पंड्याला दुखापत झाली आहे. पंड्याची दुखापत गंभीर स्वरुपाची दिसत असल्यामुळे भारताची चिंता वाढली होती. त्याला बदली खेळाडू म्हणून दीपक चहरला संधी देण्यात आली आहे. पंड्यासह अक्षर पटेल व शार्दूल ठाकूर यांनाही स्पर्धेतून माघार घ्यावी लागली आहे. त्यांच्या जागी सिद्धार्थ कौल आणि रवींद्र जडेजा यांचा संघात समावेश करण्यात आला आहे.
(Asia Cup 2018 : हार्दिक पंड्याला रिप्लेसमेंट म्हणून दीपक चहर भारतीय संघात)
पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात पांड्याला ही दुखापत झाली. त्याला स्ट्रेचरवरून मैदानाबाहेर नेण्यात आले. सामन्याच्या 18 व्या षटकात पंड्या गोलंदाजी करायला आला. मात्र, पाचवा चेंडू टाकताना तो अचानक मैदानावर झोपला. त्याचा पाठीला प्रचंड वेदना होत होत्या आणि तो कळवळतही होता. त्याला उभे राहताही येत नसल्याने स्ट्रेचर मागवण्यात आली. माघार घ्यावी लागल्यानंतर पंड्याने चाहत्यांसाठी एक भावनिक मॅसेज पोस्ट केला आहे.
त्याचा पाठीला दुखापत झाल्याचे वैद्यकीय अहवालातून समोर आल्याने त्याला उर्वरित स्पर्धेला मुकावे लागणार आहे. पंड्याने पाकिस्ताविरुद्धच्या सामन्यात 4.5 षटकांत 24 धावा दिल्या.
Web Title: Asia Cup 2018: India shocks; Hardik Pandya out of the tournament due to injury
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.