दुबई, आशिया चषक 2018: आशियाच चषकाच्या अंतिम फेरीत बांगलादेशने प्रथम फलंदाजी करताना दणक्यात सुरुवात केली. त्यामुळे भारतीय चाहत्यांच्या काळजात धस्स झालं. आता भारत हा सामना हरणार का, असेही प्रश्न काही जण विचारू लागले. पण हा 'ट्रॅक रेकॉर्ड' पाहिला, तर टीम इंडिया हा सामना हरू शकते.
आतापर्यंत एक असे समीकरण समोर आले आहे की त्यानुसार भारतीय संघ हा सामना पराभूत होऊ शकतो, असे म्हटले जाऊ शकते. आतापर्यंत कोणत्याही स्पर्धेच्या अंतिम फेरीत जेव्हा प्रतिस्पर्धी संघाने 70 धावांपेक्षा जास्त सलामी दिली आहे तेव्हा भारताला विजय मिळवता आलेला नाही.
या सामन्यात तर बांगलादेशने पंधरा षटकांमध्येच बिनबाद 86 धावा केल्या होत्या. आतापर्यंत डिसेंबर २०१६ नंतर बांगलादेशचा संघ 27 एकदिवसीय सामने खेळला आहे. पण या 27 सामन्यांमध्ये त्यांना एकदाही शतकी सलामी देता आली नव्हती. पण या सामन्यात मात्र लिटन दास