दुबई, आशिया चषक 2018 : भारत आणि बांगलादेश हे दोन संघ आशिया चषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत दोन हात करणार आहेत. पण यापूर्वीही हे दोन्ही संघ या स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचले होते. ते साल होते 2016. यावेळी बांगलादेशनेभारताचा अपमान केला होता, त्यावर जगभरातून प्रतिक्रीया उमटली होती. तो अपमान भारतीय संघ अजूनही विसरलेला नाही. त्या अपमानाचा बदला भारतीय संघ यावेळी घेणार का, हे पाहणे उत्सुकतेचे असेल.
भारत आणि बांगलादेश 2016 साली आशिया चषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत एकमेकांसमोर उभे ठाकले होते. त्यावेळी ही स्पर्धा 20 षटकांची खेळवण्यात आली होती. ही स्पर्धा वगळता अन्य सर्व स्पर्धा 50 षटकांच्या खेळवण्यात आल्या आहेत. 2016 साली अंतिम फेरी सुरु होण्यापूर्वी बांगलादेशच्या चाहत्यांनी असे काही कृत्य केले की त्यांच्यावर जगभरातून टीका झाली होती.
महेंद्रसिंग धोनी हा 2016 साली भारताचा कर्णधार होता. त्यामुळे अंतिम फेरीपूर्वी एका बांगलादेशाच्या चाहत्याने एक चित्र काढले होते, ते चांगलेच वायरल झाले होते. या चित्रामध्ये धोनीचे मुंडके बांगलादेशचा वेगवान गोलंदाज तास्किन अहमदच्या हातामध्ये दाखवले होते. बांगलादेशच्या चाहत्याने या चित्राद्वारे फक्त धोनीचा नाही तर भारताचा अपमान केला होता. त्यामुळे त्याच्यावर चहूबाजूंनी टीका झाली होती. अंतिम फेरीत भारताने बांगलादेशला आठ विकेट्स राखून सहज पराभूत केले होते आणि जेतेपद आपल्या नावावर केले होते.
बांगलादेशने 2015 साली भारतावर एकदिवसीय मालिकेत विजय मिळवला होता. त्यावेळी बांगलादेशचे चाहते विजयाच्या उन्मादामध्ये एवढे रमले होते की त्यांनी नेमके काय केले, याचा विसर त्यांना पडला. बांगलादेशच्या चाहत्यांनी एक भारतीय संघाचे पोस्टर काढले होते. या पोस्टरमध्ये त्यांनी भारतीय खेळाडूंचे अर्धे केस आणि अर्धी मिशी कापली होती. यानंतरही बांगलादेशचे चाहते टीकेचे धनी ठरले होते.
भारतीय संघाने या गोष्टीचा बदला घेतला होता. हा बदला त्यावेळी घेण्यात आला असला तरी हा अपमान भारतीय संघ अजूनही विरसलेला नक्कीच नाही. यावेळी अंतिम फेरीत पुन्हा भारतीय संघ बांगलादेशला अस्मान दाखवणार का, याची उत्सुकता चाहत्यांना आहे.