दुबई, आशिया चषक 2018 : आशिया चषक क्रिकेट स्पर्धेली सुरुवात झाली आहे. पण भारताचा पहिला सामना मंगळवारी रंगणार आहे. हा सामना सुरु होण्यापूर्वीच भारताच्या तीन खेळाडूंच्या डोक्यावर टांगती तलवार असणार आहे. कारण या स्पर्धेत त्यांच्याकडून चांगली कामगिरी झाली नाही, तर त्यांना संघातूव डच्चू देण्यात येऊ शकतो. कोण आहेत हे तीन खेळाडू, ते पाहूया...
अंबाती रायुडू : आतापर्यंत अंबाती रायुडूला काही संधी देण्यात आला, पण त्याला आतापर्यंत संघातील स्थान भक्कम करता आलेले नाही. आतापर्यंत 34 सामन्यांमध्ये त्याने 50.23च्या सरासरीने 1055 धावा केल्या आहेत. ही आकडेवारी चांगली दिसत असली तरी त्याला कामगिरीत सातत्य न राखता आल्याने त्याला संघातून डच्चू मिळू शकतो.
मनीष पांडे : आतापर्यंत मनीष पांडेला 2015-18 या कालावधीमध्ये फक्त 22 सामनेच खेळायला मिळाले आहेत. गेल्या वर्षी मनीषला दहा एकदिवसीय सामने खेळण्याची संधी मिळाली होती. या सामन्यांमध्ये त्याला 34.20च्या सरासरीने 172 धावा करता आल्या होत्या. कामगिरीत सातत्य न राखल्यामुळे त्याचे संघातील स्थान धोक्यात आले आहे.
दिनेश कार्तिक : इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत दिनेश कार्तिकने संघाचा विश्वास गमावला आहे. आतापर्यंत 68 डावांमध्ये त्याला 29.74च्या सरासरीने 1517 धावा करता आल्या आहेत. त्याचबरोबर त्याला आता महेंद्रसिंग धोनीबरोबर रीषभ पंतबरोबरही स्पर्धा होणार आहे. त्यामुळे कार्तिकसाठी ही धोक्याची घंटा आहे.