दुबई, आशिया चषक 2018 : भारताने आशिया चषक स्पर्धेच्या सुपर फोर गटातील सामन्यात बांगलादेशच्या तीन फलंदाजांना पहिल्या दहा षटकांत माघारी धाडले. बांगलादेशचे दोन्ही सलामीवर 16 धावांवर तंबूत परतले असताना अनुभवी खेळाडू शकीब अल हसन भारतासाठी डोकेदुखी ठरत होता. त्याने फटकेबाजी करताना बांगलादेशला मजबूत स्थितीत आणण्याचे प्रयत्न केले. मात्र, माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीने त्याच्या मनसुब्यांबवर पाणी फिरवले. शकीब फलंदाजीला आला त्यावेळी बांगलादेशची अवस्था 1 बाद 15 अशी होती. त्यात एक धावांची भर घालून बांगलादेशचा आणखी एक फलंदाज माघारी परतला. अशा परिस्थितीत शकीबने सामन्याची सुत्र हातात घेतली. त्याच्या नियंत्रित खेळाने भारताचा कर्णधार रोहित शर्माला तणावात टाकले. त्यामुळेच पंचांच्या एका निर्णयावर रोहितने हुज्जत घातली.
- Cricket Buzz»
- बातम्या»
- Asia Cup 2018 : महेंद्रसिंह धोनीची चतुराई; रोहित शर्माला दिलेला सल्ला यशस्वी
Asia Cup 2018 : महेंद्रसिंह धोनीची चतुराई; रोहित शर्माला दिलेला सल्ला यशस्वी
Asia Cup 2018: भारताने आशिया चषक स्पर्धेच्या सुपर फोर गटातील सामन्यात बांगलादेशच्या तीन फलंदाजांना पहिल्या दहा षटकांत माघारी धाडले.
By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2018 6:10 PM