दुबई, आशिया चषक 2018 : भारतीय क्रिकेट संघाचा आशिया चषक स्पर्धेतील पहिला सामना मंगळवारी हाँगकाँग संघाविरुद्ध होणार आहे. भारताचे दहा खेळाडू गेल्या आठवड्यातच दुबईत दाखल झाले आहेत, तर इंग्लंड दौऱ्यातील काही सदस्य विश्रांतीनंतर आशिया चषक स्पर्धेसाठी येणार आहेत. यामध्ये मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री आणि साहाय्यक प्रशिक्षक यांचाही समावेश आहे. रवी शास्त्री यांच्या अनुपस्थितीत भारतीय खेळाडूंना मार्गदर्शन करण्याची जबाबदारी माजी कर्णधार आणि अनुभवी खेळाडू महेंद्रसिंग धोनीने आपल्या खांद्यावर घेतली आहे.
कर्णधार रोहित शर्मा आणि मनिष पांडे यांनी नेटमध्ये या गोलंदाजांचा सामना केला. त्यांनी बराच काळ फलंदाजीचा सराव केला. त्यानंतर 37 वर्षीय धोनी नेटमध्ये आला आणि त्याने फिरकी गोलंदाजीचा सामना करण्यास प्राधान्य दिले. केदार जाधव आणि अंबाती रायडू यांनीही कसून सराव केला. हाँगकाँगविरुद्धच्या लढतीपूर्वी शिखर धवन, लोकेश राहुल, हार्दिक पांड्या, दिनेश कार्तिक, जस्प्रीत बुमरा आणि शार्दुल ठाकूर हे दुबईत दाखल होणार आहेत. हे सहा खेळाडू इंग्लंड दौऱ्यावर होते.