Asia Cup 2018: पाकिस्तानविरुद्ध टीम इंडियाला प्रोत्साहन देण्यासाठी 'तो' क्रिकेटवेडा विकणार आपली बाईक

तो ठार क्रिकेटवेडा. आता त्याला जायचं आहे ते दुबईमध्ये. पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात त्याला टीम इंडियाला प्रोत्साहन द्यायचं आहे. पण दुबईमध्ये जाण्यासाठी त्याच्याकडे सध्याच्या घडीला पैसे नाहीत.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2018 03:37 PM2018-09-16T15:37:20+5:302018-09-16T15:38:32+5:30

whatsapp join usJoin us
Asia Cup 2018: one cricket fanselling his bike to promote Team India against Pakistan | Asia Cup 2018: पाकिस्तानविरुद्ध टीम इंडियाला प्रोत्साहन देण्यासाठी 'तो' क्रिकेटवेडा विकणार आपली बाईक

Asia Cup 2018: पाकिस्तानविरुद्ध टीम इंडियाला प्रोत्साहन देण्यासाठी 'तो' क्रिकेटवेडा विकणार आपली बाईक

whatsapp join usJoin usgoogleNewsNext
ठळक मुद्देपाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात टीम इंडियाला चीअर करण्याचे त्याने ठरवले आहे. त्यासाठी चक्क त्याने आपली बाईक विकण्याचा निर्णय घेतला.

दुबई, आशिया चषक स्पर्धा 2018 : एखाद्या गोष्टीचं वेड असलं की त्यासाठी माणसं काहीही करू शकतात. तशीच त्याचीही गोष्ट. तो ठार क्रिकेटवेडा. भारताचा माजी महान फलंदाज सचिन तेंडुलकर याचा तर तो परमभक्त. आता त्याला जायचं आहे ते दुबईमध्ये. पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात त्याला टीम इंडियाला प्रोत्साहन द्यायचं आहे. पण दुबईमध्ये जाण्यासाठी त्याच्याकडे सध्याच्या घडीला पैसे नाहीत. पण आता पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात टीम इंडियाला चीअर करण्याचे त्याने ठरवले आहे. त्यासाठी चक्क त्याने आपली बाईक विकण्याचा निर्णय घेतला.

आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत प्रत्येकाला भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना पाहायचा आहे. त्यालाही दुबईमध्ये काहीही करून जायचे आहे. दुबईला जाण्याचे तिकीट आणि विसा याचा खर्च २९, ४०० रुपये एवढा येणार आहे. त्याच्याकडे सध्याच्या घडीला एवढे पैसे नाहीत. त्यामुळेच त्याने आपली बाईक विकण्याचा निर्णय घेतला आहे. बाईक विकून त्याला ३५ हजार रुपये मिळणार आहेत. त्यामुळे सध्या त्याच्याकडे बाईक विकण्यापासून सध्यातरी दुसरा पर्याय दिसत नाही.

या चाहत्याचे नाव आहे सुधीर. क्रिकेटच्या सामन्यांमध्ये बऱ्याचदा तुम्ही त्याला पाहिला असेल. अंगावर तिरंग्याचा रंग लावून सचिनचे नावर त्यावर कोरलेले असते. यापूर्वी सचिन आपल्या या चाहत्याला आर्थिक मदत करत होता. पण आता सचिनकडे कितीवेळा हात पसरायचे असे त्याला वाटते, त्यामुळेच त्याने आपली बाईक विकण्याचा निर्णय घेतला आहे.

याबाबत सुधार म्हणाला की, "मी जेव्हा जेव्हा मदत मागितली तेव्हा मला सचिन कधीच नाही म्हणाले नाहीत. पण त्यांच्याकडे मी तरी किती वेळा मदत मागायची. सध्याच्या घडीला ते लंडनमध्ये आहेत. त्यामुळे मी आता स्वखर्चाने दुबईला जायचा निर्णय घेतला आहे. माझ्याकडे एवढे पैसे नाहीत, पण बाईक विकून मला ते पैसे मिळू शकतात. " 

Web Title: Asia Cup 2018: one cricket fanselling his bike to promote Team India against Pakistan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.