दुबई, आशिया चषक 2018 : आशिया चषक स्पर्धेतील जेतेपदाचा प्रबळ दावेदार म्हणून संयुक्त अरब अमिराती येथे दाखल झाला होता. सर्फराज अहमदच्या नेतृत्वाखाली पाकिस्तानने स्पर्धेत विजयी सलामीही दिली, परंतु त्यानंतर त्यांनी गाडी रुळावरून घसरली. पाकिस्तानला पारंपरिक स्पतिस्पर्धी भारताकडून दोनवेळा सपशेल मार खावा लागला. त्यात बांगलादेशविरुद्धच्या पराभवानंतर त्यांचे स्पर्धेतील आव्हानही संपुष्टात आले.
पाकिस्तानच्या या लाजीरवाण्या कामगिरीनंतर माजी कर्णधार शोएब मलिकने सहकाऱ्यांचे चांगलेच कान टोचले. त्याने भारतीय संघाकडून शिकण्याचा सल्ला दिला आणि भारताचा हा संघ जगातील सर्वोत्तम संघ असल्याचेही तो म्हणाला. भारतात कशा प्रकारे खेळाडू घडवले जातात, हेही पाकिस्तानने शिकावे, असा खोचक टोमणाही त्याने मारला.
तो म्हणाला,''तुम्ही संघबांधणीच्या प्रक्रियेत असता, त्यावेळी तुम्हाला वेळ देणे गरजेचे असते. ही वेळ घाबरण्याची किंवा खेळाडूंची बदलाची नाही. तुम्ही संघात बरेच बदल केलेत, तरीही नवीन आलेल्यांना वेळ द्यावा लागेल. भारतात खेळाडू कसे घडवले जातात, हे आम्हाला शिकण्याची आवश्यकता आहे. भारताचा हा जगातील सर्वोत्तम संघ आहे.''