मुंबई, आशिया चषक 2018 : भारताचा विराट कोहली हा सध्याच्या घडीला जगातील सर्वोत्तम फलंदाजांपैकी एक आहे. पण कोहलीला पाकिस्तानच्या एका फलंदाजाने पिछाडीवर टाकले असून हा एक चर्चेचा विषय ठरला आहे.
आशिया चषक स्पर्धेला सुरुवात झाली आहे. या स्पर्धेतच पाकिस्तानच्या खेळाडूने कोहलीला मागे टाकले आहे. पाकिस्तानने आशिया चषकातील पहिल्या सामन्यात सहज विजय मिळवला. या सामन्यातच कोहलीला पाकिस्तानच्या फलंदाजाने मागे टाकले आहे.
पाकिस्तानच्या बाबर आझमने दोन हजार धावा पूर्ण करताना कोहलीला मागे टाकले आहे. कमी सामन्यांमध्ये दोन हजार धावा पूर्ण करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत हशिम अमला अव्वल स्थानी आहे. त्याने ४० सामन्यांमध्ये दोन हजार धावा पूर्ण केल्या होत्या. त्यानंतर दुसऱ्या स्थानावर संयुक्तरीत्या बाबरसह पाकिस्तानचे माजी कर्णधार झहीर अब्बास आणि इंग्लंडचा माजी धडाकेबाज फलंदाज केव्हिन पीटरसन यांचा समावेश आहे.