Join us  

Asia Cup 2018 : शास्त्री गुरूजी जेव्हा रोहित-धवनची शाळा घेतात...

Asia Cup 2018: भारताने आशिया चषक स्पर्धेच्या सुपर फोर गटातील सामन्यात पाकिस्तानवर दणदणीत विजय मिळवून अंतिम फेरीत प्रवेश निश्चित केला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2018 1:24 PM

Open in App

दुबई, आशिया चषक 2018 : भारताने आशिया चषक स्पर्धेच्या सुपर फोर गटातील सामन्यात पाकिस्तानवर दणदणीत विजय मिळवून अंतिम फेरीत प्रवेश निश्चित केला आहे. रविवारी झालेल्या सामन्यात रोहित शर्मा आणि शिखर धवन यांनी वैयक्तिक शतकी खेळी करून भारताला 9 विकेट व 63 धावा राखून विजय मिळवून दिला. पाकिस्तानचे 238 धावांचे लक्ष्य भारताने 39.3 षटकांत 1 विकेटच्या मोबदल्यात सहज पार केले.

या विजयाने आनंदीत झालेल्या मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी सामन्यानंतर 'हिटमॅन' रोहित आणि 'गब्बर' धवन यांची मुलाखत घेतली. त्यात त्यांनी प्रश्नांची गुगली टाकताना रोहित व धवनची विकेट घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, पाकिस्तानच्या गोलंदाजांची सफाईने धुलाई करणाऱ्या या फलंदाजांनी शास्त्री गुरूजींची प्रत्येक गुगली सीमापार पाठवली. शास्त्री गुरूजींनी भरवलेल्या या शाळेचा पूर्ण व्हिडिओ पाहा खालील लिंकवर...

http://www.bcci.tv/videos/id/6510/ravi-shastri-presents-the-hitman-gabbar-show

टॅग्स :आशिया चषकभारत विरुद्ध पाकिस्तानरवी शास्त्रीरोहित शर्माशिखर धवन