मुंबई - आशिया चषक स्पर्धेत विराट कोहलीला विश्रांती मिळण्याची शक्यता अधिक आहे. पण मग त्याच्या अनुपस्थितीत कर्णधाराची जबाबदारी कोणाकडे सोपवण्यात येईल, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. विराटसह हार्दिक पांड्यालाही विश्रांती मिळू शकते. विराटच्या गैरहजेरीत कर्णधार कोण, याबाबत जास्त सस्पेन्स न ठेवता ही जबाबदारी मुंबईच्या रोहित शर्माकडे जाण्याची अधिक शक्यता आहे.
मर्यादित षटकांच्या सामन्यांत उप कर्णधाराची जबाबदारी रोहितच सांभाळतो. गतवर्षी त्याला ही जबाबदारी दिली होती आणि त्यानंतर त्याने अनेक सामन्यांत संघाचे नेतृत्वही केले. मायदेशात श्रीलंकेविरुद्धात झालेल्या मालिकेतील रोहितच कर्णधार होता. त्यावेळी विराटने लग्नासाठी रजा घेतली होती. निदाहास चषक स्पर्धेतही विराटने विश्रांती घेतली होती आणि त्याच्या गैरहजेरीत रोहितने नेतृत्व करत संघाला जेतेपद पटकावून दिले होते.
(Asia cup 2018: भारत-पाकिस्तान भिडणार, पण या दिग्गज खेळाडूशिवाय; भारताला मोठा फटका?)
मग उपकर्णधार कोण? हा नवा प्रश्न समोर येतो. ही जबाबदारी शिखर धवनकडे जाते का, हे पाहणे औत्सुक्याचे आहे. निदाहास चषक स्पर्धेत धवनने ही भूमिका पार पाडली होती.