Asia Cup 2018: Fun Time; मैदानाबाहेर प्रतिस्पर्धी कर्णधारांच्या गप्पा रंगतात तेव्हा... 

Asia Cup 2018: बांगलादेश आणि श्रीलंका यांच्यातील लढतीने आशिया चषक स्पर्धेला सुरूवात होणार आहे. शनिवारी दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर हा सामना होणार आहे. या स्पर्धेच्या पूर्वसंध्येला सर्व कर्णधारांची संयुक्त पत्रकार परिषद झाली.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2018 09:50 AM2018-09-15T09:50:20+5:302018-09-15T09:50:47+5:30

whatsapp join usJoin us
Asia Cup 2018: Rohit Sharma, Sarfraz Ahmed, Mashrafe Mortaza funny pre-press conference conversation | Asia Cup 2018: Fun Time; मैदानाबाहेर प्रतिस्पर्धी कर्णधारांच्या गप्पा रंगतात तेव्हा... 

Asia Cup 2018: Fun Time; मैदानाबाहेर प्रतिस्पर्धी कर्णधारांच्या गप्पा रंगतात तेव्हा... 

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

दुबई, आशिया चषक 2018 : बांगलादेश आणि श्रीलंका यांच्यातील लढतीने आशिया चषक स्पर्धेला सुरूवात होणार आहे. शनिवारी दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर हा सामना होणार आहे. या स्पर्धेच्या पूर्वसंध्येला सर्व कर्णधारांची संयुक्त पत्रकार परिषद झाली. भारत-पाकिस्तान सामन्यावर होणारे भाष्य आणि अन्य घडामोडी टिपण्यासाठी प्रसारमाध्यमांचे कॅमेरे सज्ज होते. मात्र, या पत्रकार परिषदेतील सर्व कर्णधारांच्या प्रतिक्रियांचे चित्रण करताना कॅमेरामन्सनी भारताचा कर्णधार रोहित शर्मा,  पाकिस्तानचा कर्णधार सर्फराज अहमद आणि बांगलादेशचा कर्णधार मश्रफे मोर्ताझा यांच्यात रंगलेल्या 'त्या' Funny गप्पाही टिपल्या आणि मैदानाबाहेर कर्णधार काय चर्चा करतात हे सर्वांना समजले.

( Asia Cup 2018: आजपासून आशिया चषकाचा महासंग्राम)

कर्णधारांच्या ऑफ द रेकॉर्ड गप्पांमध्ये बांगलादेशचा शब्बीर रहमानच्या निलंबनाचा विषय निघाला. नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी रहमानवर सहा महिन्यांची बंदी घालण्यात आली होती. या विषय निघताच रोहित, सर्फराज आणि मोर्ताझा यांच्यात बऱ्याच लाईट मूड गप्पा झाल्या. सर्फराजने हा विषय छेडला. त्याने विचारले की,''शब्बीरला लग्न करायचे नाही का, तो सतत नियमांचे उल्लंघन करत आहे?'' त्यावर मोर्ताझाला त्याच्या खेळाडूंना आवरण्याचा सल्ला रोहितने दिला. 
कर्णधारांमध्ये रंगलेल्या या Funny गप्पांचा व्हिडिओ पाहा... 

Asia Cup 2018: विराटच्या अनुपस्थितीतही भारतच जेतेपदाचा प्रबळ दावेदार, 'दादा'चे भविष्य)

याव्यतिरिक्त रोहितने भारत आणि पाकिस्तान सामन्यावरही आपले मत व्यक्त केले. तो म्हणाला,''या सामन्याचा सर्वांना उत्सुकता आहे, परंतु आम्ही एका वेळी एका सामन्यावर लक्ष केंद्रीत करत आहोत. पाकिस्तानविरुद्ध खेळण्याची नेहमीच उत्सुकता लागलेली असते.''

आशिया चषक स्पर्धेतून प्रत्येक संघ पुढील वर्षी होणाऱ्या विश्वचषक स्पर्धेसाठी संघबांधणी करण्यासाठी प्रयत्नशील आहे. '' विश्वचषक स्पर्धेत सकारात्मक मानसिकतेने उतरण्याचा प्रत्येकाचा प्रयत्न असणार आहे. पण, आम्ही एवढी दूरचा विचार करत नाही. आशिया चषक स्पर्धेतून विश्वचषक स्पर्धेसाठी संघबांधणी करण्याचा प्रत्येकाचा विचार असेल,'' असे रोहितने सांगितले. 

Web Title: Asia Cup 2018: Rohit Sharma, Sarfraz Ahmed, Mashrafe Mortaza funny pre-press conference conversation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.