ठळक मुद्देशतकासह रोहितने एकदिवसीय कारकिर्दीतील सात हजार धावांचा पल्लाही गाठला.
दुबई, आशिया चषक 2018, भारत विरुद्ध पाकिस्तान : भारताचा कर्णधार रोहित शर्माने पाकिस्तानविरुद्धच्या सामन्या दमदार फलंदाजी केली. त्याच्या फलंदाजीचे गोडवे साऱ्यांनीच गायले. हा सामना पाहायला रोहितची पत्नी रितिकाही आली होती. या सामन्यात जेव्हा रोहितने षटकार लगावला तेव्हा रितिकाने आपली खास प्रतिक्रीया व्यक्त केली.
पाकिस्तानच्या आव्हानाचा पाठलाग करतान रोहित फलंदाजीला आला. या खेळीमध्ये त्याला दोनदा जीवदान मिळाले. पण त्यानंतरही तो खेळपट्टीवर पाय रोवून उभा राहिला आणि शतकही झळकावले. या शतकासह रोहितने एकदिवसीय कारकिर्दीतील सात हजार धावांचा पल्लाही गाठला.
रोहित शर्मा जेव्हा 59 धावांवर होता, तेव्हा त्याने एक गगनचुंबी षटकार लगावला. हा षटकार पाहून समालोचकही दंग झाले. मैदानातील चाहतेही नाचायला लागले. हा सामना पाहायला आलेल्या रितिकालाही हा फटका आवडला. या फटक्यानंतर ती उभी राहिली, टाळ्या वाजवल्या आणि खास प्रतिक्रीयाही दिली.
हा पाहा तो संपूर्ण व्हिडीओ
Web Title: Asia Cup 2018: on Rohit Sharma's six his wife Reacting, Watch Video ...
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.