Asia Cup 2018 : करायला गेला धोनीची कॉपी अन् पाकिस्तानचा कर्णधार पडला तोंडघशी

Asia Cup 2018: भारताचा अनुभवी यष्टिरक्षक महेंद्रसिंह धोनीने आशिया चषक स्पर्धेतील अफगाणिस्ताविरुद्धच्या सामन्यात संघाचे नेतृत्व केले.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2018 12:12 PM2018-09-27T12:12:04+5:302018-09-27T12:12:21+5:30

whatsapp join usJoin us
Asia Cup 2018: Sarfraz Ahmed tries pulling off an MS Dhoni against Bangladesh | Asia Cup 2018 : करायला गेला धोनीची कॉपी अन् पाकिस्तानचा कर्णधार पडला तोंडघशी

Asia Cup 2018 : करायला गेला धोनीची कॉपी अन् पाकिस्तानचा कर्णधार पडला तोंडघशी

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

दुबई, आशिया चषक 2018 : भारताचा अनुभवी यष्टिरक्षक महेंद्रसिंह धोनीनेआशिया चषक स्पर्धेतील अफगाणिस्ताविरुद्धच्या सामन्यात संघाचे नेतृत्व केले. कर्णधार म्हणून त्याचा हा 200 वा सामना होता आणि त्याला अनिर्णीत निकालावर समाधान मानावे लागले. मात्र, कर्णधारपद सोडल्यानंतरही धोनी अनेकदा सामन्यात नेतृत्व करताना दिसला आहे. आशिया चषक स्पर्धेतही त्याची प्रचिती येत आहे.

सुपर फोर गटातील बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात त्याच्या सांगण्यावरून कर्णधार रोहित शर्माने क्षेत्ररक्षणात बदल केला. त्याचा फायदा संघाला झाला आणि शकीब अल हसन माघारी परतला. पाकिस्तानचा कर्णधार सर्फराज अहमदनेही बुधवारी झालेल्या बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात धोनीची कॉपी करण्याचा प्रयत्न केला. पण, त्याला तोंडघशी पडावे लागले. 

भारत-बांगलादेश सामन्यात रवींद्र जडेजाच्या गोलंदाजीवर बांगलादेशच्या शकीब अल हसन याने सलग दोन चौकार मारले. त्यानंतर धोनीने रोहितला बोलावून क्षेत्ररक्षणात बदल करण्यास सांगितला. रोहितने त्वरित शिखर धवनला स्लिपमधून स्क्वेअर लेगला हलवले आणि पुढच्याच चेंडूवर स्वीप मारणाऱ्या शकीबचा झेल धवनने टिपला.  



पाकिस्तान आणि बांगलादेश यांच्यातील सामन्यात पाकचा कर्णधार सर्फराज यानेही धोनीची कॉपी केली. त्याने हसन अलीच्या गोलंदाजीवर स्लीपच्या खेळाडूला दुसरीकडे हलवले. पण, पुढच्याच चेंडूवर बांगलादेशच्या फलंदाजाच्या बॅटीचा चुंबन घेत चेंडू स्लीपमधून सीमारेषे पलिकडे गेला.

पाहा हा व्हिडीओ... 
https://vimeo.com/291919571

Web Title: Asia Cup 2018: Sarfraz Ahmed tries pulling off an MS Dhoni against Bangladesh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.