दुबई, आशिया चषक 2018 : भारताचा अनुभवी यष्टिरक्षक महेंद्रसिंह धोनीनेआशिया चषक स्पर्धेतील अफगाणिस्ताविरुद्धच्या सामन्यात संघाचे नेतृत्व केले. कर्णधार म्हणून त्याचा हा 200 वा सामना होता आणि त्याला अनिर्णीत निकालावर समाधान मानावे लागले. मात्र, कर्णधारपद सोडल्यानंतरही धोनी अनेकदा सामन्यात नेतृत्व करताना दिसला आहे. आशिया चषक स्पर्धेतही त्याची प्रचिती येत आहे.
सुपर फोर गटातील बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात त्याच्या सांगण्यावरून कर्णधार रोहित शर्माने क्षेत्ररक्षणात बदल केला. त्याचा फायदा संघाला झाला आणि शकीब अल हसन माघारी परतला. पाकिस्तानचा कर्णधार सर्फराज अहमदनेही बुधवारी झालेल्या बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात धोनीची कॉपी करण्याचा प्रयत्न केला. पण, त्याला तोंडघशी पडावे लागले.
भारत-बांगलादेश सामन्यात रवींद्र जडेजाच्या गोलंदाजीवर बांगलादेशच्या शकीब अल हसन याने सलग दोन चौकार मारले. त्यानंतर धोनीने रोहितला बोलावून क्षेत्ररक्षणात बदल करण्यास सांगितला. रोहितने त्वरित शिखर धवनला स्लिपमधून स्क्वेअर लेगला हलवले आणि पुढच्याच चेंडूवर स्वीप मारणाऱ्या शकीबचा झेल धवनने टिपला.
पाहा हा व्हिडीओ... https://vimeo.com/291919571