Join us  

Asia Cup 2018 : 'स्वच्छ भारत'वर भडकला शोएब अख्तर, न्यूज अँकरला दिलं उलट उत्तर

Asia Cup 2018: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना म्हणजे क्रिकेट चाहत्यांसाठी पर्वणीच. या सामन्याचे समीक्षण करण्यासाठी दोन्ही देशांमधील माजी खेळाडूंना वाहिनींवर बोलावण्याची परंपरा आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2018 11:23 AM

Open in App

दुबई, आशिया चषक 2018 : भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना म्हणजे क्रिकेट चाहत्यांसाठी पर्वणीच.  या सामन्याचे समीक्षण करण्यासाठी दोन्ही देशांमधील माजी खेळाडूंना वाहिनींवर बोलावण्याची परंपरा आहे. त्यामुळे आपला संघ कसा वरचढ आहे, हे सांगण्यात माजी खेळाडूंमध्येही अनेकदा जुंपलेली पाहायला मिळाले आहे. यावेळी मात्र खेळाडू आणि चॅनलची न्यूज अँकर यांच्यात शाब्दिक बाचाबाची झालेली दिसली. 'स्वच्छ भारत'वरून पाकिस्तानचा माजी गोलंदाज शोएब अख्तरचा पारा चढला आणि त्याने भारतीय न्यूज अँकरला उलट उत्तर दिले. 

आशिया चषक स्पर्धेतील सुपर फोर गटातील सामन्यापूर्वी अख्तरला बोलावण्यात आले होते. त्यावेळी न्यूज अँकरने साखळी गटातील पराभवाची आठवण करून देताला वापरलेल्या 'स्वच्छ भारत' या शब्दावर अख्तरने आपला संयम गमावला.  शोएब अख्तरशी बोलताना ती म्हणाली,'' भारतात स्वच्छता अभियान सुरू आहे आणि भारतीय क्रिकेट संघाने ते फारच मनावर घेतलेले दिसत आहे. शंभर तासापूर्वी पाकिस्तानचा दारूण पराभव करणारा भारतीय संघ पुन्हा विजय मिळवण्यासाठी सज्ज झाला आहे.'' 

अँकरच्या या वाक्यावर अख्तरने नाराजी प्रकट केली. तो म्हणाला,'' मला तुझे नाव माहित नाही. तरीही मी तुझा आदर करतो आणि मर्यादेत राहुल तु मला प्रश्न विचार, मी त्याचे नक्की उत्तर देईन. धुलाई होगी आणि स्वच्छता होगी असे शब्द तु वापरत असशील तर मी त्यावर उत्तर देणार नाही. मी येथे क्रिकेटशी निगडीत प्रश्नांची उत्तर देण्यासाठी आलो आहे.''  पाहा हा व्हिडीओ...

टॅग्स :आशिया चषकभारत विरुद्ध पाकिस्तान