दुबई, आशिया चषक 2018 : पहिल्या सामन्यात श्रीलंकेचा बांगालादेशकडून श्रीलंकेचा दणदणीत पराभव झाला होता. सोमवारी त्यांचा दुसरा सामना अफगाणिस्तानविरुद्ध होणार आहे. या सामन्यात श्रीलंकेचा संघ विजय मिळवणार का, असा सवाल चाहते विचारत आहेत.
पहिल्या सामन्याची सुरुवात श्रीलंकेने चांगली केली होती. पहिल्याच षटकात श्रीलंकेचा वेगवान गोलंदाज लसिथ मलिंगाने बांगलादेशच्या दोन फलंदाजांना बाद केले होते. त्यानंतर मात्र बांगालादेशच्या मुशफिकर रहिमने 144 धावांची झुंजार खेळी साकारली आणि संघाला 261 धावा उभारता आल्या.
बांलगादेशच्या 262 धावांचा पाठलाग करताना श्रीलंकेचा संघ 124 धावांत आटोपला होता. या पराभवानंतर आता श्रीलंकेकडे पुढील फेरीत पोहोचण्यासाठी अखेरची संधी असेल. या सामन्यात श्रीलंकेचा अफगाणिस्तानने पराभव केला तर त्यांचे या स्पर्धेतील आव्हान संपुष्टात येऊ शकते.