दुबई, आशिया चषक 2018 : भारत आणि पाकिस्तान हे दोन कट्टर प्रतिस्पर्धी समोरासमोर आले की, दोन्ही देशांतील क्रिकेट चाहत्यांची धाकधुक वाढते. दोन्ही देशांतील राजकीय संबंध लक्षात घेता या संघांमध्ये क्रिकेट मालिका मागील अनेक वर्षांपासून झालीच नाही. केवळ आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये उभय संघ समोरासमोर येतात, तेवढीच चाहत्यांसाठी पर्वणी. आशिया चषक स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान दोनवेळा समोरासमोर आले आणि त्यात भारताने बाजी मारली. मात्र, या दोन देशांच्या सामन्यांबाबतची उत्सुकता ओसरल्याची आकडेवारी समोर आली आहे.
आशिया चषक स्पर्धेतील दोन्ही संघांच्या सामन्यांतील व्ह्युअर्सशीपच्या आकडेवाडीला ब्रॉडकास्टरने सर्वात कमी रेटींग दिले आहे. क्रिकेट सामन्यांच्या लाईव्ह टेलिकास्टला नियंत्रित करणाऱ्या 'बार्क' या संस्थेने हा दावा केला आहे. आशिया चषक स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान यांच्यात 19 सप्टेंबरला झालेला सामना टीव्हीवर पाहणाऱ्या प्रेक्षकांची संख्या ही 29.4 कोटी राहिली. बार्कच्या आकडेवारीनुसार मागील तीन वर्षांतील दोन्ही देशांमध्ये झालेल्या सामन्यातील ही निच्चांक आकडेवारी आहे.
याआधी भारत आणि पाकिस्तान यांच्यात 18 जून 2017 मध्ये ओव्हल मैदानावर चॅम्पियन्स ट्रॉफीचा अंतिम सामना खेळवण्यात आला होता. बार्कच्या आकडेवारीनुसार 72.3 कोटी व्ह्युअर्सनी हा सामना पाहिला. या स्पर्धेच्याच लीग सामन्यात दोन्ही देश समोरासमोर आले होते आणि त्याची आकडेवारी 47.4 कोटी होती.
या आकडेवारीनुसार भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यातील रस कमी झाल्याचे जाणकारांचे मत आहे. मात्र, विराट कोहलीची अनुपस्थिती आणि पाकिस्तानचा कमकुवत संघ याला कारणीभूत असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
Web Title: Asia Cup 2018: TRP reduced in the match between India and Pakistan
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.