Asia Cup 2018: विराट कोहलीने भारतीय संघाला दिल्या शुभेच्छा

Asia Cup 2018: रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ आशिया चषक स्पर्धेच्या मोहिमेला आजपासून सुरूवात करत आहे. भारतीय संघाचा पहिलाच सामना दुबळ्या हाँगकाँग संघाशी होणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2018 04:16 PM2018-09-18T16:16:58+5:302018-09-18T16:20:11+5:30

whatsapp join usJoin us
Asia Cup 2018: Virat Kohli wishes Team India good luck | Asia Cup 2018: विराट कोहलीने भारतीय संघाला दिल्या शुभेच्छा

Asia Cup 2018: विराट कोहलीने भारतीय संघाला दिल्या शुभेच्छा

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

मुंबई, आशिया चषक 2018 : रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ आशिया चषक स्पर्धेच्या मोहिमेला आजपासून सुरूवात करत आहे. भारतीय संघाचा पहिलाच सामना दुबळ्या हाँगकाँग संघाशी होणार आहे. दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर भारत पहिल्यांदाच खेळणार आहे. पण, या स्पर्धेत विराट कोहलीची उणीव क्रिकेट चाहत्यांना जाणवणार आहे. विराटने ही उणीव भरून काढली आहे. त्याने भारतीय संघासाठी विशेष शुभेच्छा पाठवल्या आहेत. 



दीड महिन्यांच्या इंग्लंड दौऱ्यानंतर विराटला विश्रांती देण्याचा निर्णय भारतीय नियामक मंडळाने घेतला. इंग्लंड दौऱ्यात विराटच्या पाठीच्या दुखण्याने डोकं वर काढलं होतं. त्यामुळे त्याने सामना सुरू असताना सीमारेषेबाहेर जवळपास 30 मिनिटांची विश्रांती घेतली. भारतीय संघातील प्रमुख खेळाडू असलेल्या विराटबाबत कोणताही धोका पत्करण्याची बीसीसीआयची तयारी नाही. त्यात आगामी ऑस्ट्रेलिया दौऱ्याचे महत्त्व लक्षात घेता विराटला पुरेशी विश्रांती देणे गरजेचे होते. त्यामुळे त्याला आशिया चषकापासून दूर ठेवण्यात आले.

(Asia Cup 2018: भारतीय संघ पहिल्यांदाच उतरणार दुबईच्या मैदानावर; १३१ स्टेडियमवर खेळलेत सामने )

सुट्टीवर असलेल्या विराटने भारतीय संघाला ट्विटरवरून शुभेच्छा दिल्या आहेत. विराटच्या अनुपस्थितीत रोहितवर जेतेपद कायम राखण्याची जबाबदारी असणार आहे. 


Web Title: Asia Cup 2018: Virat Kohli wishes Team India good luck

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.