Join us  

Asia Cup 2018 : विराट कोहलीचे काय होणार... रोहित शर्मा म्हणतो कर्णधारपद स्वीकारायला मी सज्ज

विराट कोहलीला आतापर्यंत एकदाही भारताला आशिया चषक स्पर्धेचे जेतेपद जिंकवून देता आलेले नाही. त्यामुळे आता विराटऐवजी रोहितला भारताचे कर्णधारपद देण्यात यावे, असे चाहते म्हणत आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2018 6:44 PM

Open in App
ठळक मुद्देजर रोहितकडे भारताचे कर्णधारपद देण्यात आले तर कोहलीचे काय होणार, हा प्रश्न साऱ्यांना पडला आहे.

दुबई, आशिया चषक 2018  : रोहित शर्माच्या नेतृत्त्वाखाली भारताने आशिया चषक स्पर्धेच्या जेतेपदाला गवसणी घातली. आशिया चषक जिंकवून देणारा रोहित हा तिसरा मुंबईकर ठरला. विराट कोहलीला आतापर्यंत एकदाही भारताला आशिया चषक स्पर्धेचे जेतेपद जिंकवून देता आलेले नाही. त्यामुळे आता विराटऐवजी रोहितला भारताचे कर्णधारपद देण्यात यावे, असे चाहते म्हणत आहे. त्याचबरोबर रोहितनेही आता मी भारताचे कर्णधारपद यापुढेही भूषवायला सज्ज आहे, असे म्हटले आहे. त्यामुळे जर रोहितकडे भारताचे कर्णधारपद देण्यात आले तर कोहलीचे काय होणार, हा प्रश्न साऱ्यांना पडला आहे.

इंग्लंड दौऱ्यात कोहलीच्या नेतृत्त्वाखाली भारताला एकदिवसीय मालिका गमवावी लागली होती. त्याचबरोबर कसोटी मालिकेतही भारताला मानहानीकारक पराभव पत्करावा लागला होता. त्यानंतर कोहलीने आशिया चषक स्पर्धेसाठी विश्रांती घेण्याचा निर्णय घेतला आणि रोहितकडे संघाचे नेतृत्त्व सोपवण्यात आले. रोहितच्या नेतृत्त्वाखाली भारताला आशिया चषकात एकही सामना गमवावा लागला नाही. रोहित कर्णधार असताना भारत या मालिकेत अपराजित राहीला. त्यामुळेच आता कोहलीकडून रोहितकडे नेतृत्त्व देण्यात यावे, असे चाहते म्हणत आहेत.

याबाबत रोहित म्हणाला की, " भारताच्या कर्णधारपदासाठी मी सज्ज आहे. यापुढे जेव्हा मला संधी देण्यात येईल, तेव्हा कर्णधारपद मी भूषवण्यासाठी तयार आहे. कारण संघाचे बलस्थान आणि कच्चेदुवे मला समजले आहेत. त्याचबरोबर संघात काय बदल करायला हवेत, हेदेखील मला समजले आहे. त्यामुळे जर मला संघाचे कर्णधारपद देण्यात आले तर मी देशाला चांगले निकाल देऊ शकतो. " 

टॅग्स :रोहित शर्माविराट कोहलीआशिया चषक