दुबई, आशिया चषक 2018, भारत विरुद्ध अफगाणिस्तान : मैदानात नेमके कसे खेळायला हवे, याचा उत्तम वस्तुपाठ महेंद्रसिंग धोनीने आतापर्यंत दाखवले आहे. त्यामुळे धोनीने अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यात धोनीने दिनेश कार्तिकला एक धडा शिकवला.
सिद्धार्थ कौलच्या 47व्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर मोहम्मद नबीने एक फटका मारत चोरटी धाव घेतली. त्यानंतर कार्तिकच्या हातात चेंडू विसावला होता. त्यावेळई कार्तिकने तो चेंडू पुन्हा एकदा धोनीच्या दिशेने फेकला. पण तो चेंडू धोनीपासून भरपूर लांब होता. त्याचबरोबर त्याच्या या फेकीने फलंदाज बाद होणार नव्हता. त्यामुळे त्यावेळी चेंडू फेकायची गरज नव्हती. पण तरीदेखील कार्तिकने ती चूक केली. त्यामुळेच धोनीने त्याला नजरेनेच सांगितले की, तुला चेंडू फेकायची काहीच गरज नव्हती. हा धडा कार्तिकला आयुष्यभर आठवणीत राहिल असाच आहे.