ठळक मुद्देआशिया चषकातील हाँगकाँगविरुद्धच्या पहिल्याच सामन्यात खलील अहमदला पदार्पण करण्याची संधी मिळाली आहे.
मुंबई, आशिया चषक 2018 : आशिया चषकातील हाँगकाँगविरुद्धच्या पहिल्याच सामन्यात खलील अहमदला पदार्पण करण्याची संधी मिळाली आहे. पण हा खलील अहमद नेमका कोण, हा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर जाणून घ्या...
खलील हा राजस्थानचा अष्टपैलू खेळाडू. उजव्या हाताने फलंदाजी आणि डावखुरा गोलंदाजी करणारा. खलीलने 2016 साली भारताच्या 19-वर्षांखालील संघात स्थान मिळवले होते त्यानंतर 2016-17 साली राजस्थानमधील आंतरराज्य ट्वेन्टी-20 स्पर्धेत तो खेळताना दिसला. 2017 साली त्याने राजस्थानकडून रणजी करंडकामध्येही पदार्पण केले आहे.