दुबई, आशिया चषक 2018 : भारताने आशिया चषक स्पर्धेत पाकिस्तानवर 8 विकेट व 126 चेंडू राखून दणदणीत विजय मिळवला. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने पाकिस्तानला सर्व आघाड्यांवर चीतपट केले. भारतीय गोलंदाजांनी सुरेख कामगिरी करताना पाकिस्तानला 162 धावांवर रोखले. त्यानंतर रोहित ( 52 ) आणि शिखर धवन ( 46) यांनी भारताच्या विजयाचा पाया रचला.
( Asia Cup 2018 : भारत-पाकिस्तान सामन्याचा एवढा बाऊ कशाला?)
दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम प्रेक्षकांची खचाखच भरले होते. 15 महिन्यांनंतर हे दोन कट्टर प्रतिस्पर्धी समोर आल्यामुळे सर्वांची उत्सुकताही शिगेला पोहोचली होती. या सामन्यात खेळीमेळीच्या वातावरणामुळे प्रेक्षकांची वाहवा मिळवली. शिखर धवनचे पाकिस्तानच्या गोलंदाजाच्या खांद्यावर हात ठेवून गप्पा मारणे असो किंवा स्पर्धेपूर्वी रोहितचे पाकिस्तानचा कर्णधार सर्फराज अहमद याच्याशी शेअर केलेले जोक्स, यांनी क्रिकेटच्या मैदानावर वेगळे मैत्रीपर्व पाहायला मिळाले.
(Asia Cup 2018: भारताने नोंदवला पाकिस्तानवर सर्वात मोठा विजय, कसा ते वाचा)
बुधवारी झालेल्या या सामन्यात युजवेंद्र चहलने दाखवलेल्या खिलाडूवृत्तीचे सोशल मीडियावर कौतुक होत आहे. त्याने पाकिस्तानच्या उस्मान खान शिनवारीप्रती दाखवलेली खिलाडूवृत्ती क्रीडा चाहत्यांचे मनं जिंकून गेली. सामन्याच्या 43व्या षटकात मोहम्मद आमीरसह उस्मान खेळपट्टीवर फलंदाजीसाठी होता. चहल त्याचवेळी उस्मानच्या जवळच क्षेत्ररक्षण करत होता. या सामन्यात चहलने उस्मानच्या बूटांची लेस बांधली. चहलची ही खिलाडूवृत्ती सोशल मीडियावर कौतुकास पात्र ठरली.
(Asia Cup 2018 : हार्दिक पंड्याला रिप्लेसमेंट म्हणून दीपक चहर भारतीय संघात)
28 वर्षीय चहलने या सामन्यात 7 षटकांत 34 धावा दिल्या. या सामन्यात भारतीय गोलंदाजांची कामगिरी उल्लेखनीय झाली. भारताकडून केदार जाधव आणि भुवनेश्वर कुमार यांनी यावेळी प्रत्येकी तीन बळी मिळवले. पाकिस्तानच्या आव्हानाचा पाठलाग करत रोहित शर्माने अर्धशतक झळकावत विजयात मोलाची भूमिका बजावली. रोहितने 39 चेंडूंत सहा चौकार आणि तीन षटकारांच्या जोरावर 52 धावा केल्या. शिखर धवनने 46 धावा करत रोहितला चांगली साथ दिली. हे दोघे बाद झाल्यावर अंबाती रायुडू आणि दिनेश कार्तिक यांनी प्रत्येकी नाबाद 31 धावांची खेळी साकारत संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.
Web Title: Asia Cup 2018: Yuzvendra Chahal wins hearts with brilliant gesture during Pakistan clash
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.