Asia Cup 2022: "मलिक आ ही गए", हसन अलीला पाकिस्तानी संघात स्थान मिळणार?, सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस

आशिया चषक २०२२ पूर्वी पाकिस्तानच्या संघाला मोठा झटका बसला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2022 05:50 PM2022-08-21T17:50:55+5:302022-08-21T17:55:21+5:30

whatsapp join usJoin us
Asia Cup 2022 A lot of memes are going viral on social media about Hasan Ali replacement in Pakistan's squad | Asia Cup 2022: "मलिक आ ही गए", हसन अलीला पाकिस्तानी संघात स्थान मिळणार?, सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस

Asia Cup 2022: "मलिक आ ही गए", हसन अलीला पाकिस्तानी संघात स्थान मिळणार?, सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

नवी दिल्ली :  आशिया चषक २०२२ (Asia Cup 2022) ची स्पर्धा तोंडावरच असताना पाकिस्तानच्या संघाला शुक्रवारी मोठा झटका बसला. संघातील प्रमुख गोलंदाज शाहिन शाह आफ्रिदी त्याच्या दुखापतीमुळे आशिया चषकातून बाहेर झाला आहे. २७ ऑगस्टला आशिया चषक सुरू होणार अन् २० ऑगस्टला त्यांना मोठा धक्का बसला. टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत भारतीय संघाचे कंबरडे मोडणारा खेळाडूच आता दुखापतीमुळे ६ महिन्यांसाठी मैदानाबाहेर गेला आहे. बाबर आजमच्या नेतृत्वाखाली आशिया चषक जिंकण्याचे स्वप्न पाहणाऱ्या पाकिस्तानला हा मोठा धक्का आहे. दरम्यान, आफ्रिदीच्या जागेवर पाकिस्तानच्या संघात कोणाला स्थान मिळणार याबाबत सर्वांनाच उत्सुकता आहे.

माहितीनुसार, पाकिस्तानच्या संघात वेगवान गोलंदाज हसन अलीचा (Hasan Ali) समावेश होण्याची दाट शक्यता आहे. मागील वर्षी पार पडलेल्या टी-२० विश्वचषकात त्याला प्रभावशाली गोलंदाजी करण्यात अपयश आले होते. मात्र एक घातक गोलंदाज म्हणून त्याची सर्वत्र ख्याती आहे. टी-२० विश्वचषकातील खराब प्रदर्शनामुळेच त्याला आशिया चषकाच्या संघातून वगळण्यात आले होते. मात्र आता आफ्रिदीची कमी भरून काढण्यासाठी त्याचा संघात समावेश होण्याची शक्यता नाकारता येत नाही. 
 
नेटकऱ्यांच्या निशाण्यावर हसन अली
दरम्यान, शाहिन आफ्रिदीच्या जागी पाकिस्तानच्या संघात हसन अलीला संधी मिळणार का यासाठी काही वेळ प्रतीक्षा करावी लागेल. मात्र अलीला संघात स्थान मिळणार हे ऐकूनच सोशल मीडियावरील मंडळीने पाकिस्तानच्या संघावर निशाणा साधला आहे. हसन अलीचे अनेक भन्नाट मीम्स व्हायरल होत आहेत. मागील वर्षी पार पडलेल्या टी-२० विश्वचषकाच्या उपांत्यफेरीत पाकिस्तानचा ऑस्ट्रेलियाकडून पराभव झाला होता. या पराभवात हसन अलीचा मोठा वाटा असल्याचे चाहते त्याची खिल्ली उडवत आहेत. 

आशिया चषकासाठी पाकिस्तानचा संघ -
बाबर आझम (कर्णधार), शादाब खान, आसिफ अली, फखर जमान, हैदर अली, हारिस रौफ, इफ्तिखार अहमद, खुशदिल शाह, मोहम्मद नवाज, मोहम्मद रिझवान, मोहम्मद वसीम ज्युनिअर, नसीम शाह, शाहनवाज दहानी आणि उस्मान कादिर.  

Web Title: Asia Cup 2022 A lot of memes are going viral on social media about Hasan Ali replacement in Pakistan's squad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.