Asia Cup 2022: स्टेडियममध्ये राडा घालणाऱ्या अफगाणिस्तानच्या प्रेक्षकांना UAE पोलिसांनी घेतलं ताब्यात

आशिया चषकाची स्पर्धा अंतिम टप्प्यात आली असून पाकिस्तान आणि श्रीलंका या संघांनी अंतिम फेरी गाठली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 9, 2022 02:20 PM2022-09-09T14:20:43+5:302022-09-09T14:21:29+5:30

whatsapp join usJoin us
Asia Cup 2022 Afghanistan fans arrested by UAE police for assaulting Pakistani fans | Asia Cup 2022: स्टेडियममध्ये राडा घालणाऱ्या अफगाणिस्तानच्या प्रेक्षकांना UAE पोलिसांनी घेतलं ताब्यात

Asia Cup 2022: स्टेडियममध्ये राडा घालणाऱ्या अफगाणिस्तानच्या प्रेक्षकांना UAE पोलिसांनी घेतलं ताब्यात

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

नवी दिल्ली : आशिया चषकाची (Asia Cup 2022) स्पर्धा अंतिम टप्प्यात आली आहे. आज पाकिस्तान विरूद्ध श्रीलंका (PAK vs SL) यांच्यामध्ये सामना होणार असून याच दोन संघांमध्ये ११ सप्टेंबर रोजी किताबासाठी लढत होणार आहे. भारत, पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि श्रीलंका या ४ संघांना सुपर-४ फेरी गाठता आली होती. मात्र भारत आणि अफगाणिस्तानच्या संघाचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले आहे. बुधवारी झालेल्या सामन्यात पाकिस्तानने अफगाणिस्तानचा पराभव करून फायनलमध्ये जागा मिळवली. अफगाणिस्तानचा पराभव होताच सामन्याला गालबोट लागले आणि अफगाणिस्तानच्या चाहत्यांनी स्टेडियममध्येच राडा घातला. अनेक पाकिस्तानी चाहत्यांना मारहाण केली, खुर्च्यांनी तोडफोड करण्यात आली होती. आता याप्रकरणी यूएई पोलिसांनी (UAE Police) मोठी कारवाई करत अफगाणिस्तानच्या प्रेक्षकांना ताब्यात घेतले आहे.

दरम्यान, अफगाणिस्तानविरूद्ध पाकिस्तानच्या संघाने निसटता विजय मिळवल्याने अफगाणिस्तानचे चाहते चांगलेच संतापले आहेत. सामना पार पडताच अफगाणिस्तानच्या चाहत्यांनी स्टेडियममध्ये चांगलाच राडा केला. तसेच पाकिस्तानी चाहत्यांना देखील मारहाण केली. यावरून पाकिस्तानचा माजी खेळाडू शोएब अख्तरने अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाला जाब विचारला होता. अफगाणिस्तानच्या चाहत्यांनी यापूर्वी देखील अशाच प्रकारचा राडा केला असल्याचे म्हणत अख्तरने या घटनेवर नाराजी व्यक्त केली होती. आता बुधवारच्या घटनेनंतर अफगाण नागरिकांवर कारवाई करण्यात आली आहे, उर्वरितांची ओळख सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे केली जात आहे. यूएईम पोलीस आरोपी प्रेक्षकांवर कडक कारवाई करत आहेत. 

शोएब अख्तरने विचारला जाब 
शोएब अख्तरने ट्विट करत म्हटले होते, "अफगाणिस्तानचे चाहते हे काय करत आहेत. त्यांनी मागील अनेक वेळा हेच केले आहे. हा एक खेळ आहे आणि तो योग्य भावनेने खेळला जावा आणि घेतला जावा. @ShafiqStanikzai जर तुम्हाला  खेळात प्रगती करायची असेल तर तुमची गर्दी आणि तुमचे खेळाडू या दोघांना काही गोष्टी शिकण्याची गरज आहे." अशा शब्दांत अख्तरने अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डावर प्रश्न उपस्थित केले. 

अफगाणिस्तानचे प्रेक्षक ताब्यात 

पाकिस्तानच्या विजयाची हॅट्रिक
पाकिस्तानने अफगाणिस्तानला पराभूत करून सुपर-4 मध्ये आपला दुसरा विजय मिळवला आहे. हॉंगकॉंगला मोठ्या अंतराने पराभूत करून पाकिस्तानने सुपर-4 मध्ये जागा मिळवली होती. बुधवारच्या सामन्यात पाकिस्तानने नाणेफेक जिंकून प्रतिस्पर्धी संघाला प्रथम फलंदाजी करण्यास सांगितले. प्रथम फलंदाजी करताना अफगाणिस्तानचा संघ पाकिस्तानच्या आक्रमक गोलंदाजीचा सामना करू शकला नाही. अखेर 20 षटकांमध्ये 6 बाद 129 एवढी धावसंख्या करून अफगाणिस्तानने 130 धावांचे लक्ष्य दिले. या आव्हानाचा पाठलाग करताना पाकिस्तानच्या संघाची सुरूवात शानदार झाली होती. मात्र अखेरच्या काही षटकांमध्ये अफगाणिस्तानच्या गोलंदाजांनी शानदार पुनरागमन करून पाकिस्तानला घाम फोडला. मात्र अखेरच्या षटकात पाकिस्तानने निसटता विजय मिळवून विजयाची हॅट्रिक लगावली. पाकिस्तानने 19.2 षटकात 9 बाद 131 धावा करून सामना आपल्या नावावर केला. 

 

Web Title: Asia Cup 2022 Afghanistan fans arrested by UAE police for assaulting Pakistani fans

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.