नवी दिल्ली : लवकरच यूएईच्या (UAE) धरतीवर आशिया चषकाचे (Asia Cup 2022) बिगुल वाजणार आहे. स्पर्धेतील पहिला सामना २७ ऑगस्ट रोजी अफगाणिस्तान आणि श्रीलंका (SL vs AFG) यांच्यामध्ये होणार आहे. तर कट्टर प्रतिस्पर्धी भारत आणि पाकिस्तान (IND vs PAK) २८ ऑगस्ट रोजी आमनेसामने असतील. आशिया चषकाच्या १५ व्या हंगामाचे यजमानपद श्रीलंकेला मिळाले होते, मात्र देशात सुरू असलेल्या आर्थिक संकटामुळे बोर्डाने यूएईच्या धरतीवर ही स्पर्धा खेळवण्याचा निर्णय घेतला.
दरम्यान, या बहुचर्चित स्पर्धेत यंदा भारताव्यतिरिक्त एकूण ६ संघ सहभागी होत असून त्यात पाकिस्तान, श्रीलंका, बांगलादेश, अफगाणिस्तान या संघांचा समावेश आहे. पात्रता फेरीनंतर आता हॉंगकॉंगच्या संघाल आशिया चषकाचे तिकिट मिळाले आहे. या संघांची दोन गटात विभागणी करण्यात आली आहे. अ गटात भारत आणि पाकिस्तानसह हॉंगकॉंगचा संघ असेल तर ब गटात श्रीलंका, बांगलादेश आणि अफगाणिस्तान हे संघ असतील. स्पर्धेला आता अवघे काही दिवसच उरले आहेत, त्यामुळे सर्व संघाची घोषणा करण्यात आली आहे.
आशिया चषक स्पर्धेसाठी सर्व संघांचे संघ पुढीलप्रमाणे -
भारत - रोहित शर्मा (कर्णधार), के. एल. राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हूड्डा, रिषभ पंत, दिनेश कार्तिक, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, आर. अश्विन, युजवेंद्र चहल, रवी बिश्नोई. भुवनेश्वर कुमार, अर्शदीप सिंह, आवेश खान.
पाकिस्तान - बाबर आझम (कर्णधार), शादाब खान, आसिफ अली, फखर जमान, हैदर अली, हारिस रौफ, इफ्तिखार अहमद, खुशदिल शाह, मोहम्मद नवाज, मोहम्मद रिझवान, मोहम्मद वसीम ज्युनिअर, नसीम शाह, शाहिन शाह आफ्रिदी, शाहनवाज दहानी आणि उस्मान कादिर.
अफगाणिस्तान - मोहम्मद नबी (कर्णधार), नजीबुल्लाह जादरान (उपकर्णधार), अफसर झझई, अजमतुल्ला ओमरझाई, फरीद अहमद मलिक, फजल हक फारुकी, हशमतुल्ला शाहिदी, हजरतुल्ला झझई, इब्राहिम जादरान, करीम जनत, मुजीब उर रहमान, नजीबुल्लाह जादरान, नूर अहमद, नजीबुल्ला जादरान, नूर अहमद रहमानउल्ला गुरबाज, राशिद खान, समीउल्लाह शिनवारी.
राखीव खेळाडू - निजात मसूद, कैस अहमद, शराफुद्दीन अशरफ.
बांगलादेश - शाकीब अल हसन (कर्णधार), अनामूल हक, मुशफिकुर रहीम, अफिफ हुसैन, मोसद्देक हुसैन, महमुदुल्लाह रियाद, महेदी हसन, मोहम्मद सैफुद्दीन, हसन महमूद, मुस्तफिजुर रहमान, नासुम अहमद, शब्बीर रहमान, महेदी हसन मिराज, महेदी हसन, इबादत हुसैन, परवेज हुसैन इमॉन, नुरूल हसन सोहन, तस्कीन अहमद.
श्रीलंका - दासुन शनाका (कर्णधार), धनुष्का गुनाथिलका, पथुम निसंका, कुसल मेंडिस, चरित असलंका, बानुका राजपक्षे, अशेन बंडारा, धनंजया डी सिल्वा, वानिदू हसरंगा, महेश थिक्शाना, जेफ्री वांडरसे, प्रवीण जयविक्रेमा, दुष्मंथा चमीरा, बिनुरा फर्नांडो, चामिका फर्नांडो, मदुशंका, मथिशा पाथिराना, दिनेश चंडीमल, नुवानिंदू फर्नांडो, कसून रजिता.
हाँगकाँग - निझाकत खान (कर्णधार), यासीम मुर्तझा, बाबर हयात, किंचित शाह, एजाज खान, स्कॉट मॅककेनी, जीशान अली, हारून अर्शद, एहसान खान, मोहम्मद गझनफर, आयुष शुक्ला, वाजिद शाह, आफताब हुसैन, धनंजय राव, मोहम्मद वाहीद, अहान त्रिवेदी, अतीक इक्बाल.
आशिया चषक २०२२ चे संपूर्ण वेळापत्रक
- पहिला सामना - २७ ऑगस्ट - श्रीलंका विरुद्ध अफगाणिस्तान - दुबई
- दुसरा सामना - २८ ऑगस्ट - भारत विरुद्ध पाकिस्तान - दुबई
- तिसरा सामना - ३० ऑगस्ट - बांगलादेश विरुद्ध अफगाणिस्तान - शारजा
- चौथा सामना - ३१ ऑगस्ट - भारत विरुद्ध हॉंगकॉंग - दुबई
- पाचवा सामना - १ सप्टेंबर - श्रीलंका विरुद्ध बांगलादेश - दुबई
- सहावा सामना - २ सप्टेंबर - पाकिस्तान विरुद्ध हॉंगकॉंग - शारजा
- सातवा सामना - ३ सप्टेंबर - बी१ विरुद्ध बी२ - शारजाह
- आठवा सामना - ४ सप्टेंबर - ए१ विरूद्ध ए२ - दुबई
- नववा सामना - ६ सप्टेंबर - ए१ विरुद्ध बी१ - दुबई
- दहावा सामना - ७ सप्टेंबर - ए२ विरुद्ध बी२ - दुबई
- अकरावा सामना - ८ सप्टेंबर - ए१ विरुद्ध बी२ - दुबई
- बारावा सामना - ९ सप्टेंबर - बी१ विरूद्ध ए२ - दुबई
- अंतिम सामना - ११ सप्टेंबर - १ ल्या सुपर ४ मधील पहिला विरूद्ध दुसऱ्या ४ मधील पहिला - दुबई
आशिया चषक २०२२ लाईव्ह स्ट्रीमिंग
आशिया चषक २०२२ चे थेट प्रक्षेपण भारतातील स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर केले जाईल. तसेच चाहत्यांना हॉटस्टारवर मोबाईलवरही या बहुचर्चित स्पर्धेच्या सामन्यांचा आनंद घेता येईल. भारतीय वेळेनुसार सर्व सामने संध्याकाळी ७.३० वाजता सुरू होतील.
Web Title: Asia Cup 2022 All squads announced for Asia Cup, Know live streaming, time and schedule
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.