Join us  

Asia Cup 2022: 'आशिया चषक जिंकण्यासाठी आहे, प्रयोगासाठी नाही', रोहित-द्रविडवर वेंगसरकर भडकले...

Asia Cup 2022: गेल्या काही काळापासून टीम इंडियात अनेक बदल होत आहेत, त्यावरुन रोहित आणि द्रविडला टीकेचा सामना करावा लागत आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 11, 2022 8:26 PM

Open in App

Asia Cup 2022: आशिया चषक 2022मध्ये भारतीय संघाने अतिशय निराशाजनक कामगिरी केली. सुपर-4 स्टेजमधूनच भारतीय संघ बाहेर झाला. कर्णधार रोहित शर्मा आणि कोच राहुल द्रविड यांच्याकडून संघात होत असलेल्या विविध बदलांमुळे त्यांच्यावर टीका होत आहे. यातच आता माजी दिग्गज क्रिकेटर दिलीप वेंगसरकर यांनीदेखील टीम इंडियाच्या रणनितीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

'मोठ्या टूर्नामेंट प्रयोगासाठी नाहीत'दिलीप वेंगसरकर म्हणाले की, 'भारतीय संघ अजूनही विविध प्रयोग करत आहे. दिनेश कार्तिकला संघात घेतले, पण खेळवले नाही. रविचंद्रन अश्विनलाही जास्त संधी दिली नाही. आगामी वर्ल्डकपसाठी चांगली प्लेइंग-11 शोधण्यासाठी हे बदल केले जात आहेत. आशिया चषक खूप मोठी टूर्नामेंट आहे. अशा प्रकारच्या टूर्नामेंट जिंकणे गरजेचे आहे. दुसऱ्या एखाद्या सीरिजमध्ये तुम्ही प्रयोग करू शकता, पण आशिया कप, वर्ल्डकपसारख्या टूर्नामेंट प्रयोग करण्यासाठी नाहीत.'

भारताची खराब कामगिरीआशिया चषकात भारत सुपर-4 स्टेजमध्ये फक्त एक सामना जिंकू शकली. यात पाकिस्तानने भारताला 5 विकेट्सने आणि नंतर श्रीलंकाने 6 विकेट्सने पराभूत केले. सलग दोन सामन्यात पराभव मिळाल्यानंतर भारतीय संघ आशिया कपमधून बाहेर पडला. अखेरच्या सामन्यात भारताने अफगाणिस्तानला 101 धावांनी मात दिली.

प्रयोगावर प्रयोग...टी-20 वर्ल्डकपपूर्वी टीम इंडियात अनेक बदल करण्यात आले. कधी कर्णधार बदलला तर कधी ओपनिंग जोडी बदलली. या सतत होणाऱ्या बदलांमुळे अनेकांनी टीम मॅनेजमेंटला फैलावर घेतले. राहुल द्रविड मुख्य कोच बनल्यानंतर टीम इंडियाने ओपनर्स म्हणून इशान किशन, ऋषभ पंत, सूर्यकुमार यादव, रोहित शर्मा, विराट कोहली, ऋतुराज गायकवाड, संजू सैमसन, दीपक हुड्डासारख्या खेळाडूंना संधी दिली आहे.

टॅग्स :एशिया कप 2022रोहित शर्माराहुल द्रविड
Open in App