Join us  

Asia Cup 2022 : आशिया चषक स्पर्धेत ३ वेळा भिडणार India - Pakistan; सौरव गांगुलीने दिला भारतीय संघाला सल्ला

Asia Cup 2022 India vs Pakistan : २७ ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या आशिया चषक स्पर्धेतील भारत-पाकिस्तान सामन्याला मोठी डिमांड आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2022 12:34 PM

Open in App

Asia Cup 2022 India vs Pakistan : २७ ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या आशिया चषक स्पर्धेतील भारत-पाकिस्तान सामन्याला मोठी डिमांड आहे. India vs Pakistan Tickets चा काळाबाजार होत असल्याचे समोर आले आहे आणि एक तिकिट लाखाच्या घरात ब्लॅकने विकले जात आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ आशिया चषक जिंकण्यासाठी सज्ज झाला आहे आणि २० ऑगस्टला यूएईसाठी संघ रवाना होईल. भारत-पाकिस्तान सामन्याची हाईप असताना BCCI अध्यक्ष सौरव गांगुली ( Sourav Ganguly) ने भारतीय संघाला सल्ला दिला आहे.

भारत-पाकिस्तान एकदा नव्हे तर ३ वेळा भिडणार; ट्वेंटी-२० वर्ल्ड कपपूर्वी बम्पर लॉटरी, जाणून घ्या कशी 

१९८४ मध्ये सुरू झालेली ही स्पर्धा २०१४पर्यंत ५० षटकांच्या फॉरमॅटमध्ये खेळवली गेली. २०१६मध्ये ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर आशिया चषकही ट्वेंटी-२०त खेळवण्यात आला होता. तेव्हा महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली भारताने जेतेपद पटकावले होते. २०१८मध्ये पुन्हा वन डे फॉरमॅटमध्ये आशिया चषक झाला आणि तेव्हाही भारताने बाजी मारली. आतापर्यंत झालेल्या १३ पर्वांत भारताने सर्वाधिक ७ जेतेपदं पटकावली आहेत. पाच जेतेपदांसह श्रीलंका दुसऱ्या आमि दोन विजयासह पाकिस्तान तिसऱ्या क्रमांकावर आहे. 

गांगुली म्हणाला, मी या स्पर्धेकडे फक्त आशिया चषक म्हणून पाहतोय... मी त्याकडे India vs Pakistan असे पाहत नाही. भारतीय संघानेही तेच करावे, अशी माझी इच्छा आहे. मी जेव्हा क्रिकेट खेळायचो, तेव्हा माझ्यासाठी पाकिस्तानविरुद्धची लढत ही अन्य लढतींप्रमाणेच होती. मी नेहमी स्पर्धा जिंकण्याचा विचार करायचो.  आताचा संघ तगडा आहे आणि त्यांनी नुकत्याच पार पडलेल्या मालिकांमध्ये दमदार कामगिरी करून दाखवली आहे. आशिया चषक स्पर्धेतही त्यांच्याकडून अशीच कामगिरी होईल अशी मला खात्री आहे.

२८ ऑगस्टला भारत-पाकिस्तान यांच्यात अ गटातील पहिला सामना होणार आहे. यानंतर सुपर ४ मध्ये उभय संघ एकमेकांसमोर येण्याची दाट शक्यता आहे आणि दोन्ही संघांचा फॉर्म पाहता फायनल त्यांच्यात झाली तर आश्चर्य वाटणार नाही.

टॅग्स :एशिया कपसौरभ गांगुलीभारत विरुद्ध पाकिस्तान
Open in App