Join us  

Asia Cup 2022 Final SL vs PAK : ६ मॅच, ६८ धावा! Babar Azam तावातावात फटका मारायला गेला अन् श्रीलंकेच्या जाळ्यात अडकला; Video 

Asia Cup 2022 Final Sri Lanka vs Pakistan Live Updates : पाकिस्तानचा कर्णधार बाबर आजम ( Babar Azam) याच्यासाठी आशिया चषक २०२२ स्पर्धा काही खास राहिली नाही.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 11, 2022 10:34 PM

Open in App

Asia Cup 2022 Final Sri Lanka vs Pakistan Live Updates : पाकिस्तानचा कर्णधार बाबर आजम ( Babar Azam) याच्यासाठी आशिया चषक २०२२ स्पर्धा काही खास राहिली नाही. आशिया चषक स्पर्धेसाठी दुबईत दाखल होण्यापूर्वी बाबरने विक्रमांची रांग लावली होती, परंतु येथे त्याच्या मानगुटीवर अपयशाचे भूत बसले. अंतिम सामन्यात त्याच्याकडून मोठ्या खेळीची अपेक्षा होती, परंतु त्यावर तो खरा उतरला नाही. बाबरसाठी श्रीलंकेने खास रणनिती आखली होती आणि त्यात तो फसला. प्रमोद मदुशान ( Pramod Madushan) याने दोन चेंडूंत दोन धक्के देत पाकिस्तानची अवस्था २ बाद २२ अशी केली. मोहम्मद रिझवान व इफ्तिकार अहमद यांनी डाव सावरला आहे. 

 शादाब खानने आसीफ अलीला दिली टक्कर, झेल सोडा श्रीलंकेला मिळाला सिक्सर, Video 

नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करताना पाकिस्तानने दमदार कामगिरी केली. कुसल मेंडीस ( ०), पथूम निसंका ( ८), दानुष्का गुणतिलका ( १), कर्णधार दासून शनाका ( २) व धनंजया डी सिल्वा ( २८) हे फलकावर ५८ धावा असताना माघारी परतले.  वनिंदू हसरंगा ( Wanindu Hasaranga) व भानुका राजपक्षा ( Bhanuka Rajapaksa ) यांनी  पाकिस्तानच्या गोलंदाजांची धुलाई सुरू केली. ३६ चेंडूंत ५८ धावांची ही भागीदारी रौफने संपुष्टात आणली. हसरंगा २१ चेंडूंत ५ चौकार व १ षटकारासह ३६ धावांवर माघारी परतला. राजपक्षाचा झेल टिपण्याच्या प्रयत्नात शादाब खान व आसीफ अली यांच्यात जोरदार टक्कर झाली. आसीफच्या हातात येणारा सोपा झेल शादाबच्या डाईव्हमुळे सीमापार गेला अन् श्रीलंकेला षटकार मिळाला. शादाबला आजच्या सामन्यात दुसऱ्यांदा दुखापत झाली. राजपक्षाने सातव्या विकेटसाठी चमिका करुणारत्नेसह ३१ चेंडूंत ५४ धावा जोडल्या व संघाला ६ बाद १७० धावांचा टप्पा गाठून दिला. राजपक्षाने ४५ चेंडूंत ६ चौकार व ३ षटकारांसह नाबाद ७१ धावा केल्या. 

कर्णधार बाबर आजम याचा अपयशाचा पाढा अंतिम सामन्यातही कायम राहिला. चौथ्या षटकात मदुशानने टाकलेला चेंडू फाईन लेगला बाबरने मोठ्या तावात टोलावला, परंतु मदुशंकाने तितक्याच चपळाईने झेल घेतला. बाबर ५ धावांवर माघारी परतला, त्यानंतर पुढच्याच चेंडूवर फखर जमान त्रिफळाचीत झाला. बाबरने आशिया चषक स्पर्धेत ६ सामन्यांत ६८ धावा केल्या. रिझवान व अहमन यांनी पाकिस्तानचा डाव सावरताना १० षटकांत २ बाद ६८ धावांपर्यंत मजल मारून दिली आहे. 

टॅग्स :एशिया कप 2022बाबर आजमपाकिस्तानश्रीलंका
Open in App