Asia Cup 2022 Final Sri Lanka vs Pakistan Live Updates : पाकिस्तान व श्रीलंका हे दोन संघ आशिया चषक स्पर्धेच्या फायनलमध्ये आज भिडत आहेत. आशिया चषकात श्रीलंका-पाकिस्तान यांच्यात आतापर्यंत १६ सामने झाले. त्यात लंकेने ११, तर पाकने केवळ ५ सामने जिंकले. श्रीलंका सर्वाधिक १२ वेळा आशिया चषक स्पर्धेची फायनल खेळतोय. कर्णधार बाबर आजमने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला अन् पाकिस्तानी फॅन्सनी "Congratulations Pakistan" ट्रेंड सुरू केला. टॉस जिंकला म्हणजे आशिया चषकही जिंकला, असा दावा ते करताना दिसत आहेत.
श्रीलंकेला पहिल्या सामन्यात अफगाणिस्तानकडून हार मानावी लागली, परंतु त्यानंतर दासून शनाकाच्या संघाने जबरदस्त पुनरागमन केले. बांगलादेश, भारत, पाकिस्तान, अफगाणिस्तान यांचा पराभव करून ते अंतिम फेरीत पोहोचले. पाकिस्तानची कामगिरी चढ उतारांची राहिली आहे. श्रीलंकेने प्रथम फलंदाजी करून यंदाच्या आशिया चषक स्पर्धेत एकही सामना जिंकलेला नाही. त्यांनी जिंकलेल्या सर्व लढती या धावांचा पाठलाग केलेल्या आहेत.
स्पर्धेचा इतिहास१९८४ मध्ये सुरू झालेली ही स्पर्धा २०१४पर्यंत ५० षटकांच्या फॉरमॅटमध्ये खेळवली गेली. २०१६मध्ये ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर आशिया चषकही ट्वेंटी-२०त खेळवण्यात आला होता. तेव्हा महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली भारताने जेतेपद पटकावले होते. २०१८मध्ये पुन्हा वन डे फॉरमॅटमध्ये आशिया चषक झाला आणि तेव्हाही भारताने बाजी मारली. आतापर्यंत झालेल्या १३ पर्वांत भारताने सर्वाधिक ७ जेतेपदं पटकावली आहेत. पाच जेतेपदांसह श्रीलंका दुसऱ्या आणि दोन विजयासह पाकिस्तान तिसऱ्या क्रमांकावर आहे.
Web Title: Asia Cup 2022 Final SL vs PAK Live Updates : Pakistan have won the toss and "Congratulations Pakistan" Trending, Pak fans after winning the toss, see Memes
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.