Join us  

Asia Cup 2022 Final SL vs PAK : पाकिस्तानने निम्मी लढाई आधीच जिंकली, श्रीलंकेची 'टॉस'च्या वेळीच कोंडी केली

Asia Cup 2022 Final Sri Lanka vs Pakistan Live Updates : जेतेपदाचा प्रबळ दावेदार भारतीय संघाला पराभवाची चव चाखवून पाकिस्तान व श्रीलंका हे दोन संघ आशिया चषक स्पर्धेच्या फायनलमध्ये आज भिडणार आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 11, 2022 7:05 PM

Open in App

Asia Cup 2022 Final Sri Lanka vs Pakistan Live Updates : जेतेपदाचा प्रबळ दावेदार भारतीय संघाला पराभवाची चव चाखवून पाकिस्तानश्रीलंका हे दोन संघ आशिया चषक स्पर्धेच्या फायनलमध्ये आज भिडणार आहेत. आशिया चषकात श्रीलंका-पाकिस्तान यांच्यात आतापर्यंत १६ सामने झाले. त्यात लंकेने ११, तर पाकने केवळ ५ सामने जिंकले. श्रीलंका सर्वाधिक १२ वेळा आशिया चषक स्पर्धेची फायनल खेळतोय.

श्रीलंकेला पहिल्या सामन्यात अफगाणिस्तानकडून हार मानावी लागली, परंतु त्यानंतर दासून शनाकाच्या संघाने जबरदस्त पुनरागमन केले. बांगलादेश, भारत, पाकिस्तान, अफगाणिस्तान यांचा पराभव करून ते अंतिम फेरीत पोहोचले. पाकिस्तानची कामगिरी चढ उतारांची राहिली आहे. पाकिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. श्रीलंकेने प्रथम फलंदाजी करून यंदाच्या आशिया चषक स्पर्धेत एकही सामना जिंकलेला नाही. त्यांनी जिंकलेल्या सर्व लढती या धावांचा पाठलाग केलेल्या आहेत.  

स्पर्धेचा इतिहास१९८४ मध्ये सुरू झालेली ही स्पर्धा २०१४पर्यंत ५० षटकांच्या फॉरमॅटमध्ये खेळवली गेली. २०१६मध्ये ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर आशिया चषकही ट्वेंटी-२०त खेळवण्यात आला होता. तेव्हा महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली भारताने जेतेपद पटकावले होते. २०१८मध्ये पुन्हा वन डे फॉरमॅटमध्ये आशिया चषक झाला आणि तेव्हाही भारताने बाजी मारली. आतापर्यंत झालेल्या १३ पर्वांत भारताने सर्वाधिक ७ जेतेपदं पटकावली आहेत. पाच जेतेपदांसह श्रीलंका दुसऱ्या आणि दोन विजयासह पाकिस्तान तिसऱ्या क्रमांकावर आहे. 

टॅग्स :एशिया कप 2022पाकिस्तानश्रीलंका
Open in App