Asia Cup 2022 Final Sri Lanka vs Pakistan Live Updates : आशिया चषक २०२२ स्पर्धेत भारतीय संघ रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली जेतेपदाचा चषक उंचावेल अशीच सर्वांना खात्री होती. पण, खेळाडूंना अपेक्षित कामगिरी करता आली नाही आणि सुपर ४ मध्ये भारताचे आव्हान संपुष्टात आले. भारत अंतिम सामना खेळेल या खात्रीने चाहत्यांनी फायनलचे तिकीट काढले होते आणि ते रोहित अँड टीमला चिअर करण्यासाठी संपूर्ण तयारीत होते. मात्र, पाकिस्तान-श्रीलंका यांच्यात जेतेपदाचा सामना होतोय.. तरीही हा सामना पाहण्यासाठी भारतीय चाहते पोहोचले, परंतु टीम इंडियाची जर्सी घातल्याने त्यांना तिकिट असूनही प्रवेश नाकारण्यात आला. भारतीय चाहत्यांसोबत हा धक्कादायक प्रकार घडला.
आशिया चषक २०२२ स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पाकिस्तान संघाने वर्चस्व गाजवल्याचे दिसतेय. नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करताना पाकिस्तानने दमदार कामगिरी केली. नसीम शाहने पहिल्या षटकात झटका देण्याची परंपरा कायम राखताना श्रीलंकेचा सलामीवीर कुसल मेंडीसला Golden Duck वर त्रिफळाचीत केले. त्यानंतर पथूम निसंका व धनंजया डी सिल्वा यांनी २१ धावांची भागीदारी करून डाव सावरण्याचा प्रयत्न केला. चौथ्या षटकात बाबरने हॅरीस रौफला गोलंदाजीवर आणले आणि त्याच्या चेंडूवर निसंकाने ( ११) मारलेला फटका चूकला. पुढच्या षटकात रौफने १५३khp च्या वेगाने चेंडू टाकून दानुष्का गुणतिलकाचा त्रिफळा उडवला.
इफ्तिखार अहमद व शादाबने त्यानंतर प्रत्येकी १ विकेट घेत श्रीलंकेचा निम्मा संघ ५८ धावांत माघारी पाठवला, धनंजया डी सिल्वा २८ धावांवर अहमदच्या गोलंदाजीवर झेलबाद झाला. शादाबने दासून शनाकाचा ( २) त्रिफळा उडवला. १० षटकांत श्रीलंकेच्या ५ बाद ६७ धावा झाल्या होत्या. वनिंदू हसरंगा व राजपक्षा यांनी श्रीलंकेची धावगती वेगाने वाढवून पाकिस्तानच्या गोलंदाजांची धुलाई सुरू केली. ३६ चेंडूंत ५८ धावांची ही भागीदारी रौफने संपुष्टात आणली. हसरंगा २१ चेंडूंत ५ चौकार व १ षटकारासह ३६ धावांवर माघारी परतला. श्रीलंकेने १६ षटकांत ६ बाद ११६ धावा केल्या.
भारतीयांचा झाला अपमान
Web Title: Asia Cup 2022 Final SL vs PAK Live Updates : SHOCKING TREATMENT as The Bharat Army and other Indian Cricket Fans told they can not enter the stadium wearing ‘India jerseys’, Video
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.