Asia Cup 2022 Final Sri Lanka vs Pakistan Live Updates : आशिया चषक २०२२ स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पाकिस्तान संघाने वर्चस्व गाजवल्याचे दिसतेय. नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करताना पाकिस्तानने दमदार कामगिरी करताना श्रीलंकेच्या ४ फलंदाजांना ५३ धावांवर माघारी पाठवले. नसीम शाहने पहिल्या षटकात विकेट घेण्याची परंपरा कायम राखली. त्यानंतर हॅरीस रौफने ( Haris Rauf) दोन धक्के दिले. त्याचा १५१ kph च्या वेगाने आलेल्या चेंडूने दानुष्का गुणतिलकाचा त्रिफळा उडवला. त्याच षटकात शादाब खानने श्रीलंकेच्या फलंदाजाला बाद देण्यासाठी अम्पायरचा हात पकडला...
आशिया चषकात श्रीलंका-पाकिस्तान यांच्यात आतापर्यंत १६ सामने झाले. त्यात लंकेने ११, तर पाकने केवळ ५ सामने जिंकले. श्रीलंका सर्वाधिक १२ वेळा आशिया चषक स्पर्धेची फायनल खेळतोय. कर्णधार बाबर आजमने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. श्रीलंकेला पहिल्या सामन्यात अफगाणिस्तानकडून हार मानावी लागली, परंतु त्यानंतर दासून शनाकाच्या संघाने जबरदस्त पुनरागमन केले. बांगलादेश, भारत, पाकिस्तान, अफगाणिस्तान यांचा पराभव करून ते अंतिम फेरीत पोहोचले. पाकिस्तानची कामगिरी चढ उतारांची राहिली आहे. श्रीलंकेने प्रथम फलंदाजी करून यंदाच्या आशिया चषक स्पर्धेत एकही सामना जिंकलेला नाही.
नसीम शाहने पहिल्या षटकात झटका देण्याची परंपरा कायम राखताना श्रीलंकेचा सलामीवीर कुसल मेंडीसला Golden Duck वर त्रिफळाचीत केले. त्यानंतर पथूम निसंका व धनंजया डी सिल्वा यांनी २१ धावांची भागीदारी करून डाव सावरण्याचा प्रयत्न केला. चौथ्या षटकात बाबरने हॅरीस रौफला गोलंदाजीवर आणले आणि त्याच्या चेंडूवर निसंकाने ( ११) मारलेला फटका चूकला. बाबरने परतीची धाव घेत सुरेख झेल घेत श्रीलंकेचा दुसरा ओपनरही माघारी पाठवला. पुढच्या षटकात रौफने १५३khp च्या वेगाने चेंडू टाकून दानुष्का गुणतिलकाचा त्रिफळा उडवला. श्रीलंकेची पहिल्या ६ षटकांत ३ बाद ४२ अशी अवस्था केली. याच षटकात भानुका राजपक्षासाठी LBW अपील झाले. मैदानावरील अम्पायरने नाबाद देताच बाबरने DRS घेतला. त्यात चेंडू यष्टींवर आदळल्याचे दिसत होते, परंतु अम्पायर कॉल दिल्याने राजपक्षा नाबाद राहिला. तेव्हा शादाब खान अम्पायरकडे जाऊन त्याचा हात पकडून फलंदाजाल बाद देण्यासाठी हट्ट करताना दिसला. व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला.