Join us  

Asia Cup 2022 Final SL vs PAK : पाकिस्तानची परंपरा कायम! Shadab Khan ने आसीफ अलीला दिली टक्कर, झेल सोडा श्रीलंकेला मिळाला सिक्सर, Video 

Asia Cup 2022 Final Sri Lanka vs Pakistan Live Updates : वनिंदू हसरंगा ( Wanindu Hasaranga) व भानुका राजपक्षा ( Bhanuka Rajapaksa ) यांनी पाकिस्तानच्या गोलंदाजांना धू धू धुतले.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 11, 2022 10:04 PM

Open in App

Asia Cup 2022 Final Sri Lanka vs Pakistan Live Updates : वनिंदू हसरंगा ( Wanindu Hasaranga) व भानुका राजपक्षा ( Bhanuka Rajapaksa ) यांनी पाकिस्तानच्या गोलंदाजांना धू धू धुतले. निम्मा संघ ५८ धावांत माघारी परतूनही श्रीलंकेने दमदार खेळ केला. श्रीलंकेच्या या पलटवारने पाकिस्तान सैरा वैरा झाला अन् चुकांमागून चूका करताना दिसला. शादाब खान ( Shadab Khan) याने आज दोन झेल टाकले. राजपक्षाला दिलेले जीवदान पाकिस्तानला महागात पडले. पाकिस्तानच्या खेळाडूंनी क्षेत्ररक्षणात झेल पकडताना एकमेकांना टक्कर देण्याची परंपरा या सामन्यातही कायम राखली. शादाब व आसीफ अली यांच्यात झालेली टक्कर हे त्याचे प्रतिक ठरले...  

श्रीलंकेच्या फलंदाजाला 'बाद' करण्यासाठी शादाब खानने धरला अम्पायरचा हात, Video Viral 

नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करताना पाकिस्तानने दमदार कामगिरी केली. कुसल मेंडीस ( ०), पथूम निसंका ( ८), दानुष्का गुणतिलका ( १), कर्णधार दासून शनाका ( २) व धनंजया डी सिल्वा ( २८) हे फलकावर ५८ धावा असताना माघारी परतले.  वनिंदू हसरंगा व राजपक्षा यांनी श्रीलंकेची धावगती वेगाने वाढवून पाकिस्तानच्या गोलंदाजांची धुलाई सुरू केली. ३६ चेंडूंत ५८ धावांची ही भागीदारी रौफने संपुष्टात आणली. हसरंगा २१ चेंडूंत ५ चौकार व १ षटकारासह ३६ धावांवर माघारी परतला.

राजपक्षाचा झेल टिपण्याच्या प्रयत्नात शादाब खान व आसीफ अली यांच्यात जोरदार टक्कर झाली. आसीफच्या हातात येणारा सोपा झेल शादाबच्या डाईव्हमुळे सीमापार गेला अन् श्रीलंकेला षटकार मिळाला. शादाबला आजच्या सामन्यात दुसऱ्यांदा दुखापत झाली. राजपक्षाने सातव्या विकेटसाठी चमिका करुणारत्नेसह ३१ चेंडूंत ५४ धावा जोडल्या व संघाला ६ बाद १७० धावांचा टप्पा गाठून दिला. राजपक्षाने ४५ चेंडूंत ६ चौकार व ३ षटकारांसह नाबाद ७१ धावा केल्या. 

 

टॅग्स :एशिया कप 2022पाकिस्तानश्रीलंका
Open in App