Join us  

Asia Cup 2022 Final SL vs PAK : ५ बाद ५८ वरून श्रीलंकेने धावांचा डोंगर उभा केला; पाकिस्तानी गोलंदाजांना Bhanuka Rajapaksa ने धू धू धुतलं...

Asia Cup 2022 Final Sri Lanka vs Pakistan Live Updates : निम्मा संघ ५८ धावांत माघारी परतूनही श्रीलंकेने दमदार खेळ केला.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 11, 2022 9:23 PM

Open in App

Asia Cup 2022 Final Sri Lanka vs Pakistan Live Updates : निम्मा संघ ५८ धावांत माघारी परतूनही श्रीलंकेने दमदार खेळ केला. वनिंदू हसरंगा ( Wanindu Hasaranga) व भानुका राजपक्षा ( Bhanuka Rajapaksa ) यांनी पाकिस्तानच्या गोलंदाजांना धू धू धुतले.. या दोघांनी सहाव्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी करून श्रीलंकेच्या मोठ्या धावसंख्येचा पाया रचला. त्यानंतर राजपक्षाने चौफेक फटकेबाजी केली. श्रीलंकेच्या या पलटवारने पाकिस्तान सैरा वैरा झाला अन् चुकांमागून चूका करताना दिसला. पाकिस्तानच्या हॅरीस रौफने २९ धावांत ३ विकेट्स घेतल्या.

भारतीय चाहत्यांचा अपमान! टीम इंडियाची जर्सी घातली म्हणून स्टेडियममध्ये नाकारला प्रवेश! Video

आशिया चषक २०२२ स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पाकिस्तान संघाने वर्चस्व गाजवल्याचे दिसतेय. नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करताना पाकिस्तानने दमदार कामगिरी केली. नसीम शाहने पहिल्या षटकात झटका देण्याची परंपरा कायम राखताना श्रीलंकेचा सलामीवीर कुसल मेंडीसला Golden Duck वर त्रिफळाचीत केले. त्यानंतर पथूम निसंका व धनंजया डी सिल्वा यांनी २१ धावांची भागीदारी करून डाव सावरण्याचा प्रयत्न केला. चौथ्या षटकात बाबरने हॅरीस रौफला गोलंदाजीवर आणले आणि त्याच्या चेंडूवर निसंकाने ( ११) मारलेला फटका चूकला. पुढच्या षटकात रौफने १५१khp च्या वेगाने चेंडू टाकून दानुष्का गुणतिलकाचा त्रिफळा उडवला. 

इफ्तिखार अहमद व शादाबने त्यानंतर प्रत्येकी १ विकेट घेत श्रीलंकेचा निम्मा संघ ५८ धावांत माघारी पाठवला, धनंजया डी सिल्वा २८ धावांवर अहमदच्या गोलंदाजीवर झेलबाद झाला. शादाबने  दासून शनाकाचा ( २) त्रिफळा उडवला. १० षटकांत श्रीलंकेच्या ५ बाद ६७ धावा झाल्या होत्या. वनिंदू हसरंगा व राजपक्षा यांनी श्रीलंकेची धावगती वेगाने वाढवून पाकिस्तानच्या गोलंदाजांची धुलाई सुरू केली. ३६ चेंडूंत ५८ धावांची ही भागीदारी रौफने संपुष्टात आणली. हसरंगा २१ चेंडूंत ५ चौकार व १ षटकारासह ३६ धावांवर माघारी परतला. श्रीलंकेने १६ षटकांत ६ बाद ११६ धावा केल्या.  

राजपक्षाचा झेल टिपण्याच्या प्रयत्नात शादाब खान व आसीफ अली यांच्यात जोरदार टक्कर झाली. आसीफच्या हातात येणारा सोपा झेल शादाबच्या डाईव्हमुळे सीमापार गेला अन् श्रीलंकेला षटकार मिळाला. शादाबला आजच्या सामन्यात दुसऱ्यांदा दुखापत झाली. राजपक्षाने सातव्या विकेटसाठी चमिका करुणारत्नेसह ३१ चेंडूंत ५४ धावा जोडल्या व संघाला ६ बाद १७० धावांचा टप्पा गाठून दिला. राजपक्षाने ४५ चेंडूंत ६ चौकार व ३ षटकारांसह नाबाद ७१ धावा केल्या.  

टॅग्स :एशिया कप 2022श्रीलंकापाकिस्तान
Open in App