Join us  

Detalis of Asia Cup 2022  : उत्सुकता India vs Pakistan सामन्याची, पण जाणून घ्या आशिया चषक स्पर्धेची सर्व माहिती; एका क्लिकवर 

All You Know About Asia Cup 2022 : आशिया चषक २०२२ स्पर्धेला आजपासून सुरुवात होणार आहे. आगामी ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या तयारीसाठी आशियाई देशांना आपापले बलस्थान व कमकुवत बाबी आजमावून पाहण्याची हीच योग्य संधी आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2022 4:03 PM

Open in App

All You Know About Asia Cup 2022 : आशिया चषक २०२२ स्पर्धेला आजपासून सुरुवात होणार आहे. आगामी ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या तयारीसाठी आशियाई देशांना आपापले बलस्थान व कमकुवत बाबी आजमावून पाहण्याची हीच योग्य संधी आहे. आशिया खंडातील सहा टॉप संघ या स्पर्धेत जेतेपदासाठी भिडणार आहेत. श्रीलंका आणि अफगाणिस्तान ( Sri Lanka vs Afaghanistan) यांच्या सामन्याने आशिया चषक २०२२ला आज सायंकाळी ७.३० वाजल्यापासून सुरूवात होणार आहे. पण, उद्या होणाऱ्या India vs Pakistan यांच्या महामुकाबल्याची सर्वांना उत्सुकता लागली आहे. 

१९८४ मध्ये सुरू झालेली ही स्पर्धा २०१४पर्यंत ५० षटकांच्या फॉरमॅटमध्ये खेळवली गेली. २०१६मध्ये ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर आशिया चषकही ट्वेंटी-२०त खेळवण्यात आला होता. तेव्हा महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली भारताने जेतेपद पटकावले होते. २०१८मध्ये पुन्हा वन डे फॉरमॅटमध्ये आशिया चषक झाला आणि तेव्हाही भारताने बाजी मारली. आतापर्यंत झालेल्या १३ पर्वांत भारताने सर्वाधिक ७ जेतेपदं पटकावली आहेत. पाच जेतेपदांसह श्रीलंका दुसऱ्या आणि दोन विजयासह पाकिस्तान तिसऱ्या क्रमांकावर आहे. 

कोणत्या देशात कोणत्या चॅनेलवर पाहू शकता आशिया चषक?

  • पाकिस्तान - PTV Sports, Ten Sports, Daraz आणि Tapmad
  • बांगलादेश - Gazi TV (GTV) / Total Sportsवर फिड शेअर केले जाणार
  • ऑस्ट्रेलिया - Fox Sports
  • न्यूझीलंड - Sky Sports
  • दक्षिण आफ्रिका - SuperSport network
  • अमेरिका, कॅनडा, नॉर्थ अमेरिका मार्केट - Willow TV
  • लंडन - Sky Sports Network
  • मध्य पूर्व व उत्तर आफ्रिका -  OSN Sports Cricket HD
  • अफगाणिस्तान - Ariana TV
  • कॅरेबियन - Flow TV
  • ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, उपखंडीय युरोप, मलेशिया, जपान, दक्षिण पूर्व आशिया - Yupp TV  
  • भारत- स्टार स्पोर्ट्स, Disney+Hotstar, DD SPORTS 

 

  • सामन्यांची वेळ - सायंकाळी ७.३० वाजल्यापासून 

आशिया चषक स्पर्धेसाठी सर्व संघांचे संघ पुढीलप्रमाणे - 

भारत - रोहित शर्मा (कर्णधार), लोकेश राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हूडा, रिषभ पंत, दिनेश कार्तिक, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, आर. अश्विन, युजवेंद्र चहल, रवी बिश्नोई. भुवनेश्वर कुमार, अर्शदीप सिंह, आवेश खान.  

पाकिस्तान - बाबर आझम (कर्णधार), शादाब खान, आसिफ अली, फखर जमान, हैदर अली, हारिस रौफ, इफ्तिखार अहमद, खुशदिल शाह, मोहम्मद नवाज, मोहम्मद रिझवान, मोहम्मद वसीम ज्युनिअर, नसीम शाह,  शाहनवाज दहानी आणि उस्मान कादिर, मोहम्मद हसनैन.

अफगाणिस्तान - मोहम्मद नबी (कर्णधार), नजीबुल्लाह जादरान (उपकर्णधार), अफसर झझई, अजमतुल्ला ओमरझाई, फरीद अहमद मलिक, फजल हक फारुकी, हशमतुल्ला शाहिदी, हजरतुल्ला झझई, इब्राहिम जादरान, करीम जनत, मुजीब उर रहमान, नजीबुल्लाह जादरान, नूर अहमद, नजीबुल्ला जादरान, नूर अहमद रहमानउल्ला गुरबाज, राशिद खान, समीउल्लाह शिनवारी.  राखीव खेळाडू - निजात मसूद, कैस अहमद, शराफुद्दीन अशरफ.

बांगलादेश - शाकीब अल हसन (कर्णधार), अनामूल हक, मुशफिकुर रहीम, अफिफ हुसैन, मोसद्देक हुसैन, महमुदुल्लाह रियाद, महेदी हसन, मोहम्मद सैफुद्दीन, हसन महमूद, मुस्तफिजुर रहमान, नासुम अहमद, शब्बीर रहमान, महेदी हसन मिराज, महेदी हसन, इबादत हुसैन, परवेज हुसैन इमॉन, नुरूल हसन सोहन, तस्कीन अहमद. 

श्रीलंका - दासुन शनाका (कर्णधार), धनुष्का गुनाथिलका, पथुम निसंका, कुसल मेंडिस, चरित असलंका, बानुका राजपक्षे, अशेन बंडारा, धनंजया डी सिल्वा, वानिदू हसरंगा, महेश थिक्शाना, जेफ्री वांडरसे, प्रवीण जयविक्रेमा, दुष्मंथा चमीरा, बिनुरा फर्नांडो, चामिका फर्नांडो, मदुशंका, मथिशा पाथिराना, दिनेश चंडीमल, नुवानिंदू फर्नांडो, कसून रजिता. 

हाँगकाँग -  निझाकत खान (कर्णधार), यासीम मुर्तझा, बाबर हयात, किंचित शाह, एजाज खान, स्कॉट मॅककेनी, जीशान अली, हारून अर्शद, एहसान खान, मोहम्मद गझनफर, आयुष शुक्ला, वाजिद शाह, आफताब हुसैन, धनंजय राव, मोहम्मद वाहीद, अहान त्रिवेदी, अतीक इक्बाल.

आशिया चषक स्पर्धेचे वेळापत्रक२७ ऑगस्ट - श्रीलंका विरुद्ध अफगाणिस्तान, दुबई ( सायंकाळी ७.३० वाजल्यापसून)२८ ऑगस्ट- भारत विरुद्ध पाकिस्तान, दुबई ( सायंकाळी ७.३० वाजल्यापसून)३० ऑगस्ट - बांगलादेश विरुद्ध अफगाणिस्तान, शाहजाह  ( सायंकाळी ७.३० वाजल्यापसून)३१ ऑगस्ट - भारत विरुद्ध हाँगकाँग, दुबई ( सायंकाळी ७.३० वाजल्यापसून)१ सप्टेंबर - श्रीलंका विरुद्ध बांगलादेश, दुबई ( सायंकाळी ७.३० वाजल्यापसून)२ सप्टेंबर - पाकिस्तान विरुद्ध हाँगकाँग, शाहजाह  ( सायंकाळी ७.३० वाजल्यापसून)

Super 4 चे वेळापत्रक... ३ सप्टेंबर - B1 विरुद्ध B2, Super 4, शाहजाह ( सायंकाळी ७.३० वाजल्यापसून)४ सप्टेंबर - A1 विरुद्ध A2, Super 4, दुबई ( सायंकाळी ७.३० वाजल्यापसून)६ सप्टेंबर - A1 विरुद्ध B1, Super 4, दुबई ( सायंकाळी ७.३० वाजल्यापसून)७ सप्टेंबर - A2 विरुद्ध B2, Super 4, दुबई ( सायंकाळी ७.३० वाजल्यापसून)८ सप्टेंबर- A1 विरुद्ध B2, Super 4, दुबई ( सायंकाळी ७.३० वाजल्यापसून)९ सप्टेंबर - B1 विरुद्ध A2, Super 4, दुबई ( सायंकाळी ७.३० वाजल्यापसून)११ सप्टेंबर - अंतिम सामना, दुबई ( सायंकाळी ७.३० वाजल्यापसून) 

टॅग्स :एशिया कप 2022भारत विरुद्ध पाकिस्तानबांगलादेशश्रीलंकाअफगाणिस्तान
Open in App