Join us  

Asia Cup 2022 IND vs HK : सूर्यकुमारची वादळी खेळी, अर्धशतकासह विराट कोहलीची गोलंदाजी; भारताची Super 4 मध्ये एन्ट्री

India Vs Hongkong Live Match Highlight : भारतीय फलंदाजांनी हाँगकाँगच्या गोलंदाजांची धुलाई करून Super 4 मध्ये जाण्यापूर्वी आत्मविश्वास कमावला.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2022 10:57 PM

Open in App

India Vs Hongkong Live Match Highlight : भारतीय फलंदाजांनी हाँगकाँगच्या गोलंदाजांची धुलाई करून Super 4 मध्ये जाण्यापूर्वी आत्मविश्वास कमावला. लोकेश राहुल व विराट कोहली हे फॉर्माशी झगडणारे फलंदाज आज चांगले खेळले. त्यानंतर गोलंदाजांनी चांगली कामगिरी करताना हाँगकाँगवर विजय मिळवला. सलग दोन विजयांसह भारत अफगाणिस्ताननंतर Super 4 मध्ये जाणारा दुसरा संघ ठरला. 

सूर्यकुमार यादवची ( Suryakumar Yadav) फटकेबाजी आज पाहण्यासारखी होती. १३ षटकांत २ बाद ९४ धावा, अशी संघाची अवस्था असताना सूर्यकुमार मैदानावर आला अन् विराट कोहलीसह ( Virat Kohli) टोलेजंग फटकेबाजी केली. सूर्याने २२ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले. त्याने २६ चेंडूंत ६ चौकार व ६ षटकारांसह नाबाद ६८ धावा चोपल्या. २०व्या षटकात सूर्याने खेचलेले चार षटकार पाहून नॉन स्ट्राईकवर असलेला विराट अवाक् झाला अन् त्याने सूर्याला नमस्कार केला. रोहित शर्मा १३ चेंडूंत २१ धावांची छोटी खेळी करून अनेक विक्रम मोडून गेला. लोकेश व विराट यांनी दुसऱ्या विकेटसाठी ४९ चेंडूंत ५६ धावांची भागीदारी केली.   लोकेश ३९ चेंडूंत २ षटकारांसह ३६ धावांवर बाद झाला.  सूर्यकुमार यादव व विराटने चांगले फटके मारले. बऱ्याच दिवसांनी विराटचा खणखणीत षटकार पाहायला मिळाला. या दोघांनी १६व्या षटकात २० धावा कुटल्या. सूर्यकुमारने २०व्या षटकात ४ षटकार खेचून २६ धावा चोपताना भारताला २ बाद १९२ धावांपर्यंत पोहोचवले. सूर्यकुमारने २६ चेंडूंत ६ चौकार व ६ षटकारांसह नाबाद ६८ धावा कुटल्या, तर विराट ४४ चेंडूंत १ चौकार व ३ षटकारांसह ५९ धावांवर नाबाद राहिला. या दोघांनी ४२ चेंडूंत ९८ धावांची भागीदारी केली.  हाँगकाँगच्या फलंदाजांनीही लढाऊ बाणा दाखवला. कर्णधार निजाकत खान (  १०) व यासीम मुर्ताझा ( ९) हे माघारी परतले. रवींद्र जडेजाने भन्नाट थ्रो करून खानला रन आऊट केले, तर अर्षदीप सिंगने मुर्ताझाची विकेट घेतली. बाबर हयातने ३५ चेंडूंत ३ चौकार व २ षटकार खेचून ४१ धावा केल्या. रवींद्र जडेजाने ही महत्त्वाची विकेट मिळवून दिली. आवेश खानने हाँगकाँगची चौथी विकेट घेताना ऐझाज खानला ( १४) बाद केले. किंचित शाह एका बाजूने संघर्ष करत होता. सहा वर्षांनंतर विराट कोहली गोलंदाजीला आला. २०१६च्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कपमध्ये उपांत्य फेरीत वेस्ट इंडिजविरुद्ध त्याने गोलंदाजी केली होती. किंचित ३० धावांवर भुवनेश्वर कुमारच्या गोलंदाजीवर झेल बाद झाला. हाँगकाँगला २० षटकांत ५ बाद १५२ धावा करता आल्या. भारताने ४० धावांनी सामना जिंकला. 

 

टॅग्स :एशिया कप 2022विराट कोहलीसूर्यकुमार अशोक यादव
Open in App