India Vs Hongkong Live Match Highlight : पाकिस्तानवर रोमहर्षक विजय मिळवल्यानंतर भारतीय संघ आज तुलनेने कमकुवत हाँगकाँगचा सामना करण्यासाठी मैदानावर उरतला आहे. रोहित शर्माच्या ( Rohit Sharma) नेतृत्वाखाली भारतीय संघ आजचा सामना जिंकून Super 4 मध्ये प्रवेश करण्यासाठी सज्ज आहे. हाँगकाँगने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. भारताने आजच्या सामन्यात मॅच विनर हार्दिक पांड्याला विश्रांती दिली आहे आणि रिषभ पंतला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवले. रोहित शर्मा ( Rohit Sharma) व लोकेश राहुल ही जोडी ओपनिंगला आली. कर्णधार ऱोहितने पहिली धाव घेताच वर्ल्ड रेकॉर्ड नोंदवला.
लोकेश राहुलची दुबईत ट्वेंटी-२०तील कामगिरी दमदार झाली आहे. त्याने १६ सामन्यांत १४७.६७च्या स्ट्राईक रेटने १ शतक व सहा अर्धशतकांसह ७३१ धावा केल्या आहेत. पाकिस्तानविरुद्ध तो गोल्डन डकवर बाद झाला होता, परंतु तो आजच्या सामन्यातून फॉर्मात येईल अशी अपेक्षा आहे. हाँगकाँगचा फिरकीपटू एहसान खन हा आशिया चषक क्वालिफायरमध्ये सर्वाधिक ९ विकेट्स घेणारा गोलंदाज आहे. २०१८मध्ये हाँगकाँगने अखेरचा भारताचा सामना केला होता अन् त्यात एहसानने रोहित व महेंद्रसिंग धोनीची विकेट घेतली होती. आता त्याने विराट कोहलीची विकेट घेण्याची इच्छा व्यक्त केली आहे.
हार्दिक पांड्याच्या जागी रिषभ पंतला संधी देण्यात आली आहे. हार्दिकने पाकिस्तनविरुद्ध ३ विकेट्स व नाबाद ३३ धावांची खेळी केली होती. रोहितचा हा आशिया चषक स्पर्धेतील २९वा सामना आहे आणि त्याने आशिया चषक मध्ये सर्वाधिक सामने खेळण्याचा माहेला जयवर्धने ( २८) याचा विक्रम मोडला. रोहितने पहिली धाव घेऊन वर्ल्ड रेकॉर्ड नोंदवला. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ३५०० धाव करणारा तो जगातला पहिला पुरुष फलंदाज ठरला. महिला क्रिकेटपटूंमध्ये सुझी बॅट्सने हा पराक्रम आधीच केला आहे. रोहितने १३४ सामन्यांत ३२.१२च्या सरासरीने ३५०२+ धावा केल्या आहेत. न्यूझीलंडचा मार्टिन गुप्तील ३४९७ धावांसह दुसऱ्या, तर विराट कोहली ३३४३ धावांसह तिसऱ्या स्थानावर आहे.
- ट्वेंटी-२०त धावांचे विक्रमी टप्पे
५०० धावा - ब्रेंडन मॅक्युलम
१००० धावा - ब्रेंडन मॅक्युलम
१५०० धावा - ब्रेंडन मॅक्युलम
२००० धावा - ब्रेंडन मॅक्युलम
२५०० धावा - रोहित शर्मा
३००० धावा - विराट कोहली
३५०० धावा - रोहित शर्मा
Web Title: Asia Cup 2022 Ind vs HK : Rohit Sharma becomes the first male player to score 3500 runs in T20I history.
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.