Asia Cup 2022 IND vs HK : काळाचं चक्र फिरलं! IPLमध्ये ठसन देणाऱ्या सूर्यकुमार यादवला विराट कोहलीचा मानाचा मुजरा

सूर्यकुमार यादवची ( Suryakumar Yadav) फटकेबाजी आज पाहण्यासारखी होती. १३ षटकांत २ बाद ९४ धावा, अशी संघाची अवस्था असताना सूर्यकुमार मैदानावर आला अन् विराट कोहलीसह ( Virat Kohli) टोलेजंग फटकेबाजी केली.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2022 09:40 PM2022-08-31T21:40:48+5:302022-08-31T21:41:23+5:30

whatsapp join usJoin us
Asia Cup 2022 IND vs HK : Time flies, Virat Kohli's gesture to Suryakumar Yadav, Mumbai indians batsman smash smashed 68* from just 26 balls with 6 fours & 6 sixes | Asia Cup 2022 IND vs HK : काळाचं चक्र फिरलं! IPLमध्ये ठसन देणाऱ्या सूर्यकुमार यादवला विराट कोहलीचा मानाचा मुजरा

Asia Cup 2022 IND vs HK : काळाचं चक्र फिरलं! IPLमध्ये ठसन देणाऱ्या सूर्यकुमार यादवला विराट कोहलीचा मानाचा मुजरा

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

India Vs Hongkong Live Match Highlight : सूर्यकुमार यादवची ( Suryakumar Yadav) फटकेबाजी आज पाहण्यासारखी होती. १३ षटकांत २ बाद ९४ धावा, अशी संघाची अवस्था असताना सूर्यकुमार मैदानावर आला अन् विराट कोहलीसह ( Virat Kohli) टोलेजंग फटकेबाजी केली. सूर्याने २२ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले. त्याने २६ चेंडूंत ६ चौकार व ६ षटकारांसह नाबाद ६८ धावा चोपल्या. २०व्या षटकात सूर्याने खेचलेले चार षटकार पाहून नॉन स्ट्राईकवर असलेला विराट अवाक् झाला अन् त्याने सूर्याला वाकून नमस्कार केला. आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सच्या याच सूर्यकुमार व RCBच्या विराट यांच्यात झालेली ठसन सर्वांनी पाहिली होती. आज त्याच सूर्याला विराटने मानाचा मुजरा केला. 


भारतीय फलंदाजांनी हाँगकाँगविरुद्ध दमदार कामगिरी केली. लोकेश राहुल, विराट कोहली यांनी फॉर्म परतल्याचे आपल्या खेळीतून जाहीर केले. सूर्यकुमार यादव त्याच्या नेहमीच्या Mr 360 या रुपात फटकेबाजी करताना दिसला. हाँगकाँगच्या एहसान खान व १९ वर्षीय आयुष शुक्ला यांची फिरकी गोलंदाजी कौतुकास्पद ठरली. रोहित शर्मा १३ चेंडूंत २१ धावांची छोटी खेळी करून अनेक विक्रम मोडून गेला. लोकेश व विराट यांनी दुसऱ्या विकेटसाठी ४९ चेंडूंत ५६ धावांची भागीदारी केली. पण, त्यांच्या धावांचा वेग संथ होता. लोकेश ३९ चेंडूंत २ षटकारांसह ३६ धावांवर बाद झाला. 


सूर्यकुमार यादव व विराटने चांगले फटके मारले. बऱ्याच दिवसांनी विराटचा खणखणीत षटकार पाहायला मिळाला. या दोघांनी १६व्या षटकात २० धावा कुटल्या. सूर्यकुमारने २०व्या षटकात ४ षटकार खेचून २६ धावा चोपताना भारताला २ बाद १९२ धावांपर्यंत पोहोचवले. सूर्यकुमारने २६ चेंडूंत ६ चौकार व ६ षटकारांसह नाबाद ६८ धावा कुटल्या, तर विराट ४४ चेंडूंत १ चौकार व ३ षटकारांसह ५९ धावांवर नाबाद राहिला. या दोघांनी ४२ चेंडूंत ९८ धावांची भागीदारी केली.



 

Web Title: Asia Cup 2022 IND vs HK : Time flies, Virat Kohli's gesture to Suryakumar Yadav, Mumbai indians batsman smash smashed 68* from just 26 balls with 6 fours & 6 sixes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.