Join us  

IND vs PAK : इतिहास रचण्यापासून फक्त एक पाऊल दूर कर्णधार रोहित, विराटचा हा खास विक्रम तोडण्यावर नजर

रोहित शर्मा (Rohit Sharma) अँड कंपनी 28 ऑगस्टरोजी पाकिस्तानला चीत करण्याच्या इराद्यानेच मैदानावर उतरेल.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2022 7:09 PM

Open in App

आशिया चषक-2022 (Asia Cup 2022)ला आजपासून सुरुवात होत आहे. या स्पर्धेत भारताचा पहिला सामना पाकिस्तानसोबत होणार आहे. टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मासाठीही (Rohit Sharma) हा सामना मोठा राहणार आहे. रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वात टीम इंडियाने यासामन्यात बाजी मारली, तर तो एक मोठा विक्रम आपल्या नावावर करेल.

...तर विशेष विक्रमाशी बरोबरी करेल रोहित शर्मा -रोहित शर्मा (Rohit Sharma) अँड कंपनी 28 ऑगस्टरोजी पाकिस्तानला चीत करण्याच्या इराद्यानेच मैदानावर उतरेल. रोहित शर्मा (Rohit Sharma)ने अद्याप पर्यंत 35 टी-20 इंटरनॅशनल सामन्यांत टीम इंडियाचे नेतृत्व केले आहे. यांपैकी त्याने 29 सामने जिंकले आहेत. जर टीम इंडियाने 28 ऑगस्टला पाकिस्तानविरुद्धचा सामना जिंकला तर हा रोहितचा या फॉरमॅटमधील 30 वा विजय असेल. याच बरोबर रोहित शर्मा 30 विजयांसह सर्वाधिक टी-20 सामने जिंकणारा दुसरा भारतीय कर्णधार ठरेल.

या कर्णधाराने जिंकले आहेत सर्वाधिक सामने -कर्णधार म्हणून टीम इंडियासाठी सर्वाधिक सामने जिंकण्याच्या यादीत विराट कोहली (Virat Kohli) सर्वात पुढे आहे. विराट कोहलीने (Virat Kohli) एकूण 50 टी-20 सामन्यांत टीम इंडियाचे नेतृत्व केले. यांपैकी त्याने 30 सामने जिंकले आहेत. रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वात संघाला आणखी एक विजय मिळाल्यास तो विराटच्या या विक्रमाची बरोबरी करेल. याच वेळी रोहित शर्माची नजर विराटचा हा विक्रम मोडण्यावरही राहणार आहे. 

आजपासून ऑगस्टपासून आशिया चषकास सुरुवात -या स्पर्धेत एकूण सहा संघ सहभागी होणार आहेत. या 6 संघांची दोन ग्रुपमध्ये विभागणी करण्यात आली आहे. ए ग्रुपमध्ये टीम इंडिया, पाकिस्तान आणि क्वालिफायर टीम आहे. तर बी ग्रुपमध्ये श्रीलंका, अफगाणिस्तान आणि बांगलादेश संघ आहेत. भारत आणि पाकिस्तान यांच्यात 28 ऑगस्टरोजी पहिला सामना होणार आहे. आशिया कप 2022 मध्ये भारत आणि पाकिस्तानदरम्यान पहिला सामना खेळला जाईल. यानंतर, सुपर 4 चे सामने सुरू होतील. दोन्ही गटांतील टॉप-2 संघ सुपर 4 साठी क्वालिफाय होतील. 

टॅग्स :रोहित शर्माविराट कोहलीभारत विरुद्ध पाकिस्तानएशिया कप 2022
Open in App