Join us  

Asia Cup 2022, IND vs PAK : भारत-पाकिस्तान लढतीपूर्वीची मोठी घडामोड! VVS Laxmanला मुख्य प्रशिक्षकपदाची जबाबदारी सोडावी लागणार

Asia Cup 2022, India vs Pakistan : आशिया चषक २०२२ च्या पहिल्याच सामन्यात अफगाणिस्तान संघाची कामगिरी पाहून आता भारत-पाकिस्तान लढतीची उत्सुकता आणखी वाढली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2022 11:32 PM

Open in App

Asia Cup 2022, India vs Pakistan : आशिया चषक २०२२ च्या पहिल्याच सामन्यात अफगाणिस्तान संघाची कामगिरी पाहून आता भारत-पाकिस्तान लढतीची उत्सुकता आणखी वाढली आहे. अफगाणिस्तानने एकहाती वर्चस्व गाजवताना श्रीलंकेवर ८ विकेट्स व ५९ चेंडू राखून विजय मिळवला. रविवारी दुबईच्या याच मैदानावर IND vs PAK महामुकाबला रंगणार आहे. पण, त्याआधी मोठी घडामोड घडतानाचे वृत्त समोर आले आहे. त्यामुळे उद्याच्या भारत-पाकिस्तान लढतीपूर्वी व्ही व्ही एस लक्ष्मण याला मुख्य प्रशिक्षकपदाची जबाबदारी सोडावी लागण्याची चिन्हे दिसत आहे. Rahul Dravid चा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यामुळे VVS Laxman कडे ही जबादारी सोपवली गेली होती. 

अफगाणिस्तानने १०.१ षटकांत सामना जिंकला; श्रीलंकेच्या गोलंदाजांना धु धु धुतला, चौकार-षटकारांचा पाऊस पाडला!

भारत-पाकिस्तान आतापर्यंत आशिया चषक स्पर्धेत १४ वेळा एकमेकांना भिडले आणि त्यात सर्वाधिक ८ विजय ब्लू आर्मीने मिळवले. पाकिस्तानला ५ विजय मिळवता आले आहेत. विराट कोहलीची ही १००वी ट्वेंटी-२० लढत आहे आणि रॉस टेलर याच्यानंतर क्रिकेटच्या तीनही फॉरमॅटमध्ये १०० सामने खेळणारा विराट दुसरा खेळाडू ठरणार आहे. त्यामुळे विराटच्या कामगिरीकडे सर्वांच्या नजरा खिळल्या आहेत. अशात भारतीय संघासाठी एक आनंदाची बातमी आली आहे. मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे आणि उद्याच्या लढतीपूर्वी तो भारतीय संघाच्या ताफ्यात दाखल होणार आहे. इंडियन एक्स्प्रेसने याबाबचे वृत्त दिले आहे.

भारतीय संघाचा थाट! दुबईत दिवसाला ५० हजार भाडं असलेल्या हॉटेलमध्ये मुक्काम

 आशिया चषक स्पर्धेला रवाना होण्यापूर्वी द्रविडचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता आणि त्यानंतर त्याला बंगळुरू येथील घरी विलगिकरणार रहावे लागले होते. त्यामुळे व्ही व्ही एस लक्ष्मणकडे तात्पुरती जबाबदारी सोपवण्यात आली होती. आता द्रविड उद्या भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदाची धुरा पुन्हा हाती घेणार आहे. भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी भारतीय संघासाठी ही खूप मोठी गोष्ट आहे. ''राहुलचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आला असून तो विमान प्रवास करण्यासाठी तंदुरुस्त आहे,''असे BCCI च्या अधिकाऱ्याने सांगितले.

टॅग्स :एशिया कप 2022भारत विरुद्ध पाकिस्तानराहुल द्रविड
Open in App