Join us  

Asia Cup 2022, IND vs PAK : मोहम्मद रिझवानने भारतीय तरुणीसोबत 'Selfie' काढण्यास दिला नकार; Video Viral 

Asia Cup 2022, India vs Pakistan : पाकिस्तानने Super 4 सामन्यात भारतावर विजय मिळवून आशिया चषक स्पर्धेतील जय-पराजयाची आकडेवारी १-१ अशी बरोबरीत आणली.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 06, 2022 4:07 PM

Open in App

Asia Cup 2022, India vs Pakistan : पाकिस्तानने Super 4 सामन्यात भारतावर विजय मिळवून आशिया चषक स्पर्धेतील जय-पराजयाची आकडेवारी १-१ अशी बरोबरीत आणली. आशिया चषक २०२२च्या पहिल्या सामन्यात भारताने ५ विकेट्स राखून विजय मिळवला होता. त्याची परतफेड करताना पाकिस्तानने ५ विकेट्स राखून विजय मिळवताना स्पर्धेच्या फायनलच्या दिशेने एक पाऊल टाकले आहे. सुपर ४च्या लढतीत पाकिस्तानच्या मोहम्मद रिझवानने ( Mohammad Rizwan) तुफान फटकेबाजी करताना मॅच विनिंग खेळी केली. आशिया स्पर्धेत १९२ धावांसह रिझवान सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे. मोहम्मद रिझवानचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय आणि त्यात त्याने भारतीय तरुणीसोबत सेल्फी काढण्यास नकार दिल्याचे दिसतेय...

प्रथम फलंदाजी करताना भारताने ७ बाद १८१ धावा केल्या. विराट कोहलीने ६० धावा करताना मोठा हातभार लावला. लोकेश राहुल व रोहित शर्मा यांनी प्रत्येकी २८ धावा केल्या. रिषभ पंत व हार्दिक पांड्या अपयशी ठरले. दीपक हुडाने ठिकठाक खेळ करताना १६ धावा केल्या. प्रत्युत्तरात बाबर आजम अपयशी ठरल्यानंतर रिझवानने एकहाती खिंड लढवली. त्याने ५१ चेंडूंत ७१धावा केल्या. मोहम्मद नवाजने २० चेंडूंत ४२ धावा करून सामना फिरवला. खुशदिल शाह ( १४*) व आसीफ अली ( १६) यांनी सामन्याचा निकाल  लावला. भुवनेश्वर कुमारने १९व्या षटकात दिलेल्या १९ धावा, अर्शदीप सिंगकडून मोक्याच्या क्षणी सोडलेला झेलही निर्णायक ठरला.

दरम्यान रिझवानचा एक व्हिडीओ सोशल व्हायरल झाला आहे. Paktv ने हा व्हिडीओ व्हायरल केला आहे. यात रिझवान भारतीय तरुणीला सेल्फी घेण्यास नकार देताना दिसतोय. त्याने त्या तरुणीला दूरूच फोटो काढण्यास सांगितले. त्यामागचं कारणही या व्हिडीओतून समोर येतंय...

पाहा व्हिडीओ...    

टॅग्स :एशिया कप 2022ऑफ द फिल्डभारत विरुद्ध पाकिस्तान
Open in App